Rahul Vaidya New Song : ‘बिग बॉस’च्या १४व्या पर्वामुळे प्रसिद्धी झोतात आलेला गायक राहुल वैद्यचं नुकतंच एक नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘आदमी है सी’ असं या गाण्याचं नाव असून या गाण्यामुळे सध्या राहुल वैद्यला ट्रोल केलं जात आहे. रोमँटिक गाणी गाणाऱ्या राहुलच्या नव्या गाण्यातील शब्द नेटकऱ्यांना खटकले आहेत. त्यामुळे नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. राहुल दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल वैद्यचं ( Rahul Vaidya ) ‘आदमी है सी’ हे नवीन गाणं त्याच्या युट्यूब चॅनेलवर ३१ जुलैला प्रदर्शित झालं आहे. दानिश साबरीने हे गाणं लिहिलं असून संगीतबद्ध देखील केलं आहे. या गाण्याला युट्यूबवर आतापर्यंत ४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याच गाण्याचा व्हिडीओ राहुल वैद्यने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यातील बोल ऐकून अनेकजण हैराण झाले आहेत. “तुझ्याकडून अशा गाण्याची अपेक्षा नव्हती”, “कृपया दारू पिण्यासाठी प्रवृत्त करू नका”, “तुझी करिअरची उतरती कळा सुरू झाली आहे”, “आता अनफॉलो बटण दाबण्याची वेळ आली आहे”, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘बालिशपणा’, ‘पागल’ म्हणणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीने दिलं चांगलंच उत्तर, म्हणाली…

हेही वाचा – Video: सिद्धार्थ आनंदच्या वाढदिवसाच्या पार्टीतील शाहरुख खानच्या जबरदस्त लूकने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

‘जिसने दारू नही पी वो आदमी है सी’, अशा ओळी राहुल वैद्यच्या ( Rahul Vaidya ) नव्या गाण्यामध्ये आहेत. हेच ऐकून नेटकरी संतापले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “भावा, तू अप्रत्यक्षरित्या दारू पिण्यासाठीचा प्रचार करत आहेस. तुझ्याकडून याची अपेक्षा नव्हती.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “राहूल मी तुला आता अनफॉलो करत आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “बकवास गाणं.”

Rahul Vaidya

हेही वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! तीन वर्षांनंतर Squid Game 2 वेब सीरिज प्रेक्षकांच्या येणार भेटीस, प्रदर्शनाची तारीख…

राहुल वैद्य सध्या ‘या’ शोमध्ये करतोय काम

दरम्यान, राहुल वैद्यच्या ( Rahul Vaidya ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘बिग बॉस १४’नंतर तो सध्या ‘कलर्स वाहिनी’वरील ‘लाफ्टर शेफ्स’मध्ये पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात तो अली गोनीचा सोबती आहे. अशातच आता ‘आदमी है सी’ या नव्या गाण्यामुळे राहुल ट्रोल होतं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul vaidya troll for his new song aadmi hai c pps