‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकाचा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १० मेला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘झी मराठी’ वाहिनीने या नव्या मालिकेची घोषणा केली. सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेचा दमदार प्रोमो शेअर करत प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली. विशेष म्हणजे नव्या मालिकेत ‘झी मराठी’चा जुना व लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेता नितीश चव्हाण प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शिवाय ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीशबरोबर अफेअरच्या चर्चा रंगलेली अभिनेत्री दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – नवरी मिळे हिटलरला: एजेच्या हळदीत लीलाचा ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…

‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अजय उर्फ अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण पाच वर्षांनंतर नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितीश प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसंच या मालिकेत ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील आणखी एक अभिनेता पाहायला मिळणार आहे. ‘टॅलेंट’ म्हणजेच अभिनेता महेश जाधव ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार आहे. याशिवाय ‘राजा रानीची गं जोडी’ फेम अभिनेत्री देखील नितीशच्या आगामी मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वर्णी, टायगर श्रॉफच्या बहीणसह झळकणार ‘हे’ ११ सदस्य

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील संजीवनीची मैत्रीण आणि ‘मन झालं बाजिंद’ मधील कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात ‘लाखात एक आमचा दादा’ दिसणार आहे. यासंदर्भात ‘मराठी टीव्ही इन्फो’ इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीश व श्वेता यांची ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – “आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही,” चिन्मय मांडलेकर, क्षिती जोगच्या ट्रोलिंगवरून भडकला पुष्कर श्रोत्री, म्हणाला, “ट्रोलर्सच्या टोळीला नेस्ताबूत…”

दरम्यान, काही वर्षांपूर्वी नितीश व श्वेताच्या सोशल मीडियावरील रील व पोस्टमुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांणा उधाण आलं होतं. पण दोघांनी आपल्यात मैत्रीचं चांगलं नातं असल्याचं सांगितलं होतं. श्वेताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘राजा रानीची गं जोडी’ आणि ‘मन झालं बाजिंद’नंतर ‘सन मराठी’वरील ‘सुंदरी’ मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत तिने सियाची भूमिका साकारली होती. शिवाय तिने बऱ्याच अल्बम साँगमध्ये काम केलं आहे.

Story img Loader