Raja Ranichi Ga jodi Fame Marathi Actress Kelvan : ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सोनार घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने संजीवनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेमुळे अल्पावधीतच शिवानी ‘संजू’ म्हणून सर्वत्र ओळखली जाऊ लागली. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच शिवानीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
शिवानी सोनार ( Marathi Actress ) अभिनेता अंबर गणपुळेसह लग्न करणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. अंबरने आतापर्यंत ‘रंग माझा वेगळा’, ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘दुर्वा’ यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, शिवानी ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ अशा मालिकांमध्ये झळकली आहे. आता लवकरच शिवानी आणि अंबर यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
थाटामाटात पार पडलं शिवानी सोनारचं केळवण
शिवानी ( Marathi Actress ) आणि अंबरच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीचं केळवण नुकतंच पार पडलं. याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना शिवानी सोनारने “घरचं केळवण/लाड” असं कॅप्शन दिलं आहे.
शिवानीच्या कुटुंबीयांनी केळवणासाठी खास तयारी केली होती. सुंदर अशी रांगोळी काढून अभिनेत्रीसाठी खास फिश थाळी बनवण्यात आली होती. रांगोळी, समई लावून मधोमध जेवणाचं ताट ठेवण्यात आलं होतं. शिवानीसाठी खास फिश फ्राय थाळी, कोलंबी मसाला, भात-भाकरी, सोलकढीचा बेत करण्यात आला होता. तर, आजूबाजूला गोडाचे पदार्थ ( केक, मिठाई, वॅफल, कॅडबरी ) ठेवून फुलांची सजावट करण्यात आल्याचं अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : मालिका संपल्यानंतर कोकणात पोहोचल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर केला स्वयंपाक; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या...
दरम्यान, शिवानी सोनारच्या ( Marathi Actress ) फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मस्त, लाडोबा सगळे लाड करून घे”, “फारच लाडकी आहे तू सर्वांची”, “शिवानी अशीच आनंदी राहा”, “आता फक्त कौतुक आणि लाड करून घे”, “सर्व छायाचित्रे झकास” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या फोटोंवर केल्या आहेत.