Rajat Dalal and Asim Riaz Fight:’बिग बॉस’च्या १८व्या पर्वात झळकलेला रजत दलाल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी रजत दलाल दिग्विजय सिंह राठीसह भांडताना दिसत होता. दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. पण, काही तासांनंतर दोघांनी एकत्र येऊन भांडण खोटं असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता रजत दलाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं असिम रियाजबरोबरचं भांडण हे त्या चर्चेचं कारण आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…

सध्या सोशल मीडियावर रजत दलाल व असिम रियाज यांच्यामधील बाचाबाचीचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. त्यामध्ये शिखर धवन आणि रुबिना दिलैक पाहायला मिळत आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडीओ अ‍ॅमेझॉन-एमएक्स प्लेअरवरील ‘बॅटलग्राउंड’ नावाच्या शोदरम्यानचा आहे. ‘बॅटलग्राउंड’ शोच्या एका कार्यक्रमात रजत दलाल, असिम रियाज, रुबिना दिलैक व शिखर धवन यांनी खास उपस्थिती दर्शवली होती. तेव्हाच अचानक रजत व असिममध्ये शा‍ब्दिक वाद सुरू झाले. हा वाद यावरच थांबला नाही, तर पुढे दोघं एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि हा वाद आणखीच पेटला. त्यामुळे शिखर धवन पटकन उठून रजत व असिमला बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागला.

तेव्हाच रुबिनालादेखील रजत व असिम यांचं भांडण पाहून धक्का बसतो आणि ती खुर्चीमधून पटकन उठून उभी राहिली. यावेळी रुबिनाला इतका राग आला की, ती रजत व असिमचं भांडण बघतही नव्हती. ती फक्त दोघांचं बोलणं ऐकताना दिसत आहे. पण, रजत व असिममधील हे भांडण खरं आहे का? की प्रँक आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही.

रजत दलाल व असिम रियाज यांच्या भांडणाचा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “मस्त अभिनय केला आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “अरे, हे नेमकं काय प्रकरण आहे?” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “हे नाटक आहे.” चौथ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “हा प्रमोशनल स्टंट वाटत आहे.” पाचव्या नेटकऱ्यानं लिहिलं, “हे खोटं भांडण आहे. काहीतरी प्रमोशन करण्यासाठी हे सगळं केलं गेलं आहे.”