‘लाखात एक आमचा दादा'( Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेपैकी एक आहे. ‘झी मराठी’वर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. बहीण-भावाच्या नात्यावर आधारलेल्या कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. नुकताच झी मराठी २०२४ चा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बहीण हा पुरस्कार या मालिकेतील तेजश्री, धनश्री, राजश्री, भाग्यश्री यांना मिळाला आहे. आता राजश्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा सहकलाकार, मालिकेत तिच्या भावाची भूमिका साकारणारा नितीश चव्हाणसाठी खास संदेश लिहिला आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील राजश्रीची सूर्यादादासाठी खास पोस्ट

ही मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेपैकी एक आहे. ‘झी मराठी’वर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. बहीण-भावाच्या नात्यावर आधारलेल्या कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. नुकताच झी मराठी २०२४ चा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बहीण हा पुरस्कार या मालिकेतील तेजश्री, धनश्री, राजश्री, भाग्यश्री यांना मिळाला आहे. आता राजश्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा सहकलाकार, मालिकेत तिच्या भावाची भूमिका साकारणारा नितीश चव्हाणसाठी खास संदेश लिहिला आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
sairaj kendre and his mom got emotional
Video : लाडक्या लेकाची दिवाळी सुट्टी संपली…; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील छोट्या सिम्बाच्या आईला अश्रू अनावर
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील राजश्री पोस्ट शेअर करत काय म्हणाली?

ईशा संजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने नितीश चव्हाणला टॅग केले आहे. तिने लिहिले, “तू सर्वोत्कृष्ट भाऊ आहेसच आणि तुझ्यामुळे आम्हीसुद्धा सर्वोत्कृष्ट बहीण ठरलो. या प्रोजेक्टने मला खूप काही दिले आहे, यामुळेच मी तुला भेटले आणि मला माझे पहिले अवॉर्डदेखील मिळाले. हा क्षण मला तुझ्याबरोबर शेअर करता आला याचा मला आनंद आहे. खूप अवॉर्ड मिळवायचे आहेत आणि आठवणी निर्माण करायच्या आहेत. बर मग? हा मग? म्हणत असंच लोकांना फाट्यावर मारत राहू.”

इन्स्टाग्राम

ईशाच्या या पोस्टवर ऐश्वर्या नारकर यांनी कमेंट करत हार्ट इमोजी दिले आहेत. चाहत्यांनी अभिनंदन असे म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लाखात एक आमचा दादा या मालिकेत नितीश चव्हाण हा भावाच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील त्याच्या पात्राचे नाव सूर्या असे आहे. आई-वडिलांची जबाबदारी घेत बहि‍णींना सांभाळणारा, त्यांच्यावर खूप प्रेम करणारा, त्यांना हवं-नको बघणारा, त्यांची काळजी करणारा आणि त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी असणारा सूर्या हा प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालतो. त्याच्या चारही बहिणीदेखील सूर्याच्या शब्दाबाहेर जात नाहीत, त्याचा आदर ठेवतात.

हेही वाचा: Video : सूरजसह गावच्या शेतात रमली जान्हवी किल्लेकर! चक्क ट्रॅक्टरही चालवला; नेटकरी म्हणाले, “भावा-बहिणीचं नातं…”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सूर्याची आई तो आणि त्याच्या बहिणी लहान असताना पळून गेल्यामुळे त्याच्या कुटुंबाला वेळोवेळी लोकांकडून बोलणी ऐकावी लागतात. परिणामी, त्याचे वडील मद्याच्या आहारी जातात, त्यामुळे त्याच्या बहि‍णींची जबाबदारी सूर्यावर येते. सूर्यादेखील ती मोठ्या हिमतीने निभावतो. सध्या तुळजाबरोबर त्याचे लग्न झाले असून ती त्याच्या प्रेमात पडत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Story img Loader