बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. राखीने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर लग्नगाठ बांधत तिने नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, सात महिन्यांपूर्वीच आदिलबरोबर लग्न केल्याची माहिती राखीने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आदिल व तिचा लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये राखी व आदिल एकमेकांना वरमाल घालताना दिसत आहेत. त्यानंतर राखीने आणखी एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

हेही वाचा>> ‘RRR’ला पुरस्कार मिळाल्यानंतर ‘तेलुगू ध्वज’चा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचं ट्वीट; अदनान सामी म्हणाला…

हेही वाचा>> Video: राखी सावंतच्या लग्नाचा व्हिडीओ समोर, बॉयफ्रेंड आदिलला वरमाला घातली अन्…

राखीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये राखी व आदिल एकमेकांचा हात पकडून चालताना दिसत आहेत. राखीने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान करत ग्लॅमरस लूक केला आहे. तर आदिलने काळ्या रंगाचं ब्लेझर परिधान केलं आहे. या व्हिडीओला राखीने Just Married असं कॅप्शन दिलं आहे. “लग्न करुन मी आनंदी आहे. माझा नवरा आदिलवर माझं खूप प्रेम आहे”, असंही तिने कॅप्शमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “तीन वर्ष ज्या सैनिकांबरोबर…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची खास पोस्ट

राखी व आदिलने २९ मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर २ जुलैला त्यांनी निकाह केला. परंतु, आदिलने लग्नाबाबत कुठेही वाच्यता करू नको असं सांगितल्याचा खुलासा राखीने केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant aadil khan wedding reception video goes viral kak