ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत ही दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाली आहे. तिने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर निकाह केल्याचे बोललं जात आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. त्या दोघांचा निकाह २९ मे २०२२ ला झाला असून त्यांनी २ जुलै २०२२ ला लग्नाचे रजिस्ट्रेशन केले आहे. आता तिने लग्न लपवण्याबरोबरच आदिलबद्दल मोठा खुलासा केला आहे.

राखी सावंतने नुकतंच ई-टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत राखी सावंतने आता लग्नाचे फोटो शेअर का केले याबद्दल मोठा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना राखी सावंत म्हणाली, “मी आणि आदिलने लग्न केलं आहे. आमचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालंय. आम्ही आधी कोर्टात लग्न केलंय आणि त्यानंतर निकाह केला. आदिलनं मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे मी या लग्नाबद्दल ७ महिने लपवून ठेवलं.”
आणखी वाचा : गळ्यात वरमाला, हातात मॅरेज सर्टिफिकेट; नवविवाहित राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? 

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…

“पण काही महिन्यांपूर्वी मी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. त्यावेळी बाहेर अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यांचं एका दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर सुरु आहे. त्यामुळेच मी माझ्या लग्नाचे गुपित सर्वांसमोर उघडं केलं आहे. मी याबद्दल योग्य वेळी बोलेनंच. पण आता मला माझे लग्न वाचावायचे आहे. मी आणि आदिलने लग्न केलंय हे जगाला समजायला हवं. मला खूप त्रास होत आहे. त्यामुळेच माझ्या लग्नाबद्दल मी जाहीरपणे सांगून टाकलं आहे, असे राखी सावंतने म्हटले.

आणखी वाचा : “आदिलने मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं” राखी सावंतचा मोठा खुलासा, म्हणाली “त्याच्या बहिणीला…”

दरम्यान राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आदिल आणि राखी यांच्या गळ्यात वरमाळा आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नाची तारीख २९ मे २०२२ लिहिलेलं दिसत आहे. याचा अर्थ राखी आणि आदिलचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. राखी सावंतचे हे दुसरं लग्न आहे.

Story img Loader