मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालं. त्यानंतर राखीचा पुन्हा लग्नाबाबत नवा ड्रामा सुरू झाला आहे. आता राखीने पती आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखीने आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा केला आहे. राखीचा एक व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आदिलवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असताना आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचंही राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> Video: वनिता खरात-सुमित लोंढेचा हळदी कार्यक्रमात भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

“माझा वापर करुन आदिलला प्रसिद्धी मिळवायची होती. आदिल खोटारडा आहे. माझ्याकडे त्याच्याविरोधातील सगळे पुरावे आहेत. आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अपेअर सुरू आहे. कुराणवर हात ठेवून त्याने त्या मुलीला ब्लॉक करण्याचं वचन दिलं होतं. पण त्याने तसं केलं नाही. आता ती मुलगी आदिलला ब्लॅकमेल करत आहे. आदिलला फक्त लोकप्रियता हवी होती. मला कोणालाही मोठं बनवायचं नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या मुलाखती घेऊन त्याला प्रसिद्धी मिळवून देऊ नका”, असं म्हणत राखीने आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा>> Photos: लॉकडाऊनमध्ये मैत्री, लुडो खेळताना झालं प्रेम अन् आता थाटणार संसार; वनिता खरात-सुमित लोंढेची लव्हस्टोरी

राखी सावंत व आदिल खानने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. तेव्हाही बऱ्याच दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. आदिलच्या अफेअरमुळे संसारात वादळ आल्याचं राखीने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant allegations on adil khan said he is a liar video kak