मनोरंजन सृष्टीतील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेले अनेक महिने ती आदिल खानबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा ती दोघं एकत्र फिरताना दिसतात. आता तिने आदिलशी गुपचूप लग्न केलं असं बोललं जाऊ लागलं आहे.

आदिल आणि राखी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांच्याही गळ्यात वरमाला आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट पहायला मिळत आहे. यावेळी राखीने पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे, तर आदिलने फॉर्मल शर्ट आणि पॅंट परिधान केली आहे. दोघांच्याही गळ्यात वरमाला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत राखी आणि आदिल मॅरेज सर्टिफिकेटवर सही करताना दिसत आहेत. या फोटोंसोबतच त्यांच्या मॅरेज सर्टिफिकेटचा फोटोही व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “बिर्याणीमध्ये कुत्र्याचे मांस वापरल्याचे कळताच…” रिद्धी डोगराने सांगितला धक्कादायक प्रसंग

या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नाची तारीख २९ मे २०२२ लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे आता या दोघांनी गेल्याच वर्षी गुपचुप लग्न उरकलं आहे अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या लग्नाविषयी राखी किंवा आदिलकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. २०१९ मध्ये राखीने एनआरआय असलेल्या रितेशशी लग्न केलं होतं. हे दोघं ‘बिग बॉस’मध्येही एकत्र सहभागी झाले होते. या शोदरम्यान त्यांच्यात विविध कारणांनी वाद निर्माण झाला आणि त्यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला.

हेही वाचा : “सोशल मीडियावर त्यांचे निर्वस्त्र…”, साजिद खानवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रींबद्दल राखी सावंतने व्यक्त केला संताप

दरम्यान, रखी सावंत नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. राखी सावंत टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती. तिने पण तिने ९ लाख रुपये घेत विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण घरातून बाहेर पडल्यावर तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचं तिला कळलं. आता राखी संपूर्ण वेळ तिच्या आईला देत त्यांची काळजी घेताना दिसत आहे.

Story img Loader