अभिनेता अक्षय केळकरला ‘बिग बॉस मराठी’मुळे नवी ओळख मिळाली. ‘बिग बॉस ४’मध्ये तो सहभागी झाला आणि या पर्वाच्या ट्रॉफीवर त्याने आपलं नाव कोरलं. या पर्वता पहिल्या दिवसापासूनच तो खूप चर्चेत होता. याच पर्वत वाइल्ड कार्ड इंट्रीतून राखी सावंतही सहभागी झाली होती. आता अनेक दिवसांनी त्या दोघांचं रियुनियन झालं आहे.
अक्षय सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. बिग बॉसचं पर्व जरी संपलं असलं तरी त्यातील स्पर्धकांशी त्याची खूप छान मैत्री आहे. आता कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने राखी सावंतशी त्याची भेट झाली.
अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये राखी आणि अक्षयची अनेक दिवसांनी भेट होताना दिसत आहे. एकमेकांना पाहताच एकमेकांकडे आले आणि त्यांनी घट्ट मिठी मारली. तसंच त्यानंतर त्यांनी खूप गप्पा मारल्या, फोटोही काढले. एकमेकांना अनेक दिवसांनंतर भेटण्याचा आनंद त्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत अक्षयने लिहिलं की, “ड्रामा क्वीन. बिग बॉस मराठी ४.”
हेही वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…
अक्षयने हा व्हिडीओ पोस्ट करतात त्यावर त्याच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. सर्वजण त्यांच्या घट्ट बॉण्डिंगचं खूप कौतुक करत आहेत. राखी सावंतने देखील या व्हिडीओवर कमेंट करत अक्षयबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. तिने लिहिलं, “बिग बॉस 4 मधील माझा स्वीटहार्ट भाऊ,मित्र…” आता हा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे.