अभिनेता साजिद खान ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर त्याच्या नावावरून बाहेर बरेच वाद सुरु झाले आहेत. शर्लिन चोप्रा मीटू चळवळीदरम्यान साजिद खानवर गंभीर आरोप केले होते. पण आता साजिदने ‘बिग बॉस १६’मध्ये एंट्री केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यावरून आता मागच्या काही दिवसांपासून साजिद खानच्या मुद्द्यावरून शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यातील वाद वाढत चालल्याचं दिसत आहे. दोघीही एकमेकींवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता दोघींनीही एकमेकींविरोधात कायदेशीर तक्रार नोंदवल्याचे समोर आले आहे.

बुधवारी राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांनी एकमेकींच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंत आणि तिची वकील फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरोधात विविध गुन्ह्यांअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यात पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह भाषा वापरणे, आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवणे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आणखी वाचा : एकता कपूर आणि दिशा पटानी यांच्यात मतभेद; शूटिंग अर्धवट सोडून अभिनेत्रीची चित्रपटातून एग्झिट, कारण…

तर दुसरीकडे राखी सावंतने शर्लिन चोप्रा विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. शर्लिनने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तिने राखी सावंतवर सारखे बॉयफ्रेंड बदलण्यावरून निशाणा साधला. यामुळे राखीने शर्लिनविरोधात तक्रार नोंदवली आहे.

हेही वाचा : “मी समाजसेविका आहे आणि…”; राखी सावंतने साजिद खानवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध उठवला आवाज

शर्लिनने ६ नोव्हेंबर रोजी तिच्या यूट्यूब आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत तिने राखीबद्दल बोलताना अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तसेच या व्हिडीओत तिने राखीवर आक्षेपार्ह आरोप केले, असे राखी सावंतने पोलिसांना सांगितले. आयपीसी कायदा ५००, ५०४, ५०९ अंतर्गत पोलिस या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

Story img Loader