बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत नेहमी चर्चेत असते. आपल्या वेगळ्या अंदाजातून मनोरंजन करताना सतत पाहायला मिळते. पण गेल्या काही दिवसांपासून ती वैयक्तिक आयुष्यातल्या प्रकरणामुळे अधिकच चर्चेत आली आहे. पती आदिल खान दुर्रानीच्या गंभीर आरोपांच्या जाळ्यात ती अडकली आहे. तसेच आता याप्रकरणात अभिनेत्री तनुश्री दत्ताने देखील उडी मारली आहे. तिने देखील राखीविषयी काही खुलासे करत गंभीर आरोप केले आहेत. अशातच काल राखीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या बायोपिकची घोषणा केली आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी ‘बिग बॉस सीझन १७’चं दार उघडणार, सलमान खानने नव्या प्रोमोमधून केलं जाहीर

गेल्या महिन्यात पती आदिल खानने सहा महिन्यांच्या तुरुंगावास भोगून बाहेर आल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राखी विरोधात पुरावे दाखवत गंभीर आरोप केले. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी राखीने देखील पत्रकार परिषद घेऊन आदिलच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. पण एवढ्यावरचं हे प्रकरण काही थांबलं नाही. अजूनही आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. अशा परिस्थितीत राखीने स्वतःच्या बायोपिकची घोषणा केली आहे. यासंबंधिचे व्हिडीओ ‘बॉलीवूड नाउ’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

व्हिडीओत राखी सावंत म्हणतेय की, “माझा बायोपिक होत आहे. गेल्या २० वर्षात राखी सावंतने जेवढं हसवलं आहे, तेवढीच ती रडली आहे. शिवाय तितक्यात वेदना देखील तिनं सहन केल्या आहेत. एका झोपडपट्टीतून एक मुलगी कोणताही गॉडफादर नसताना, चांगलं शिक्षण नसताना, फोन किंवा चांगले कपडे नसताना बॉलीवूडपर्यंत पोहोचली. हा सर्व प्रवास दाखवण्यात येणार आहे.”

हेही वाचा – “आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

हेही वाचा – दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने लग्नाच्या अफवांवर सोडलं मौन; नाराजी व्यक्त करत म्हणाली…

पुढे राखी म्हणाली की, “या बायोपिकचे किती सीझन असतील? कोण दिग्दर्शक असेल? कोण संगीतकार असेल? कोण कलाकार असतील? हे काही माहित नाही. आता आम्ही दोन जणांना विचारणा केली आहे. आलिया भट्ट आणि विद्या बालन यांना विचारलं आहे.”

हेही वाचा – “तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…

दरम्यान, आता राखीच्या या बायोपिकचं नाव काय असेल? यात काम करण्यासाठी आलिया भट्ट किंवा विद्या बालन होकार देतील का? हे येत्या काळात समजेल.

Story img Loader