बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा पती आदिल दुर्रानी ६ महिन्यांच्या तुरुंगावास भोगून बाहेर आला असून त्यानं राखीविषयी मोठे खुलासे केले आहेत. २१ ऑगस्टला आदिलनं पत्रकार परिषद घेऊन राखी विरोधात पुरावे दाखवून गंभीर आरोप केले आहेत. पण दुसऱ्या दिवशीच राखीनं लगेच पत्रकार परिषद घेऊन आदिलच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, राखीच्या काही अडचणी कमी होण्याचं नावचं घेत नाहीये. कारण आता राखीची खास मैत्रिणी राजश्रीनं तिच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
राजश्री म्हणाली की, “जेव्हापासून आदिल राखीविरोधात विधान करत आहे. तेव्हापासून राखी मला धमकी देत आहे.” याव्यतिरिक्त राजश्रीनं अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. पण लवकरच ती माध्यमांसमोर येऊन खुलासे करणार असल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा – “जर दिग्दर्शक व्हायचं असेल तर….” अभिनेता चिन्मय मांडलेकरनं दिला मोलाचा सल्ला, म्हणाला…
तर दुसऱ्या बाजूला राखी यामुळे खूप दुःखी झाली आहे. राखी एक म्हणाली की, “जेव्हा माझ्या कानावर ही गोष्ट आली, तेव्हा मी हैराण झाले. वाईट काळात राजश्री नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवाय मी सुद्धा तिच्या वाईट काळात तिच्या पाठिशी उभी राहिली आहे. ती माझ्यासाठी नेहमी खास मैत्रिण राहिल. पण माझ्या आयुष्यात इतके वाईट दिवस का येतायत, हेच मला कळतं नाहीये.”
हेही वाचा – “आपण एकत्र मिळून बदलू शकतो”, शिव ठाकरेनं जुहू बीचवर केली साफसफाई, व्हिडीओ आला समोर
दरम्यान राखीनं कालच्या पत्रकार परिषदमध्ये सांगितलं की, “आदिलनं मला धोका दिला आहे. त्यानं मला मारहाण केली आणि माझी फसवणूक केली आहे. तसेच त्यानं माझे न्यूड व्हिडीओ काढून ४५ लाखाला विकले आहेत. आदिलला बिग बॉसमध्ये जायचं आहे. त्याला स्टार बनायचं आहे. त्यामुळे तो सगळं हे करतं आहे.”