बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत व आदिल खानच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, राखी किंवा आदिल यापैकी कोणीही याबाबत भाष्य केलं नव्हतं. त्यानंतर राखीने स्वत: या गोष्टीला दुजोरा दिल्याचं वृत्त होतं. गर्भपात झाल्याचंही राखी म्हणाली होती. राखीनंतर आता तिचा बॉयफ्रेंड आदिल खानने तिच्या गरोदरपणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजने दिलेल्या वृत्तानुसार, राखीने ती गरोदर असून गर्भपात झाल्याचं म्हटलं होतं. त्या आशयाची पोस्ट ‘विरल भय्यानी’च्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली होती. “हो मी गरदोर होते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही हे मी सांगितलं होतं. पण घरातील सदस्यांनी ते गांभीर्याने घेतलं नाही. मी जोक करतेय असं म्हणत त्यांनी हसण्यावारी घेतलं”, असं पोस्टमध्ये म्हणण्यात आलं होतं. तसंच राखीचा गर्भपात झाल्याचंही तिने सांगितलं असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं.
हेही वाचा>> राखी सावंतच्या मदतीला मुकेश अंबानी आले धावून, अभिनेत्री आभार मानत म्हणाली…
राखीनंतर आता आदिलने गरोदरपणाबाबत मौन सोडलं आहे. आदिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने राखीबरोबरचा लग्नातील फोटो शेअर करत राखीच्या गर्भपाताचे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. “अशा खोट्या वृत्तांना दुजोरा देऊ नका”, अशी विनंती त्याने पोस्टमधून केली आहे.
हेही पाहा>> रितेश देशमुख-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या
हेही वाचा>> ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”
दरम्यान, राखी सावंत व आदिल खानने सात महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकलं आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत राखीने ही माहिती चाहत्यांना दिली होती. राखी व आदिलच्या लग्नावरूनही बराच ड्रामा झाला होता. आता राखीच्या गरोदरपणामुळे ते दोघेही पुन्हा चर्चेत आले आहेत.