अभिनेत्री राखी सावंतच्या संसारात वादळ आलं आहे. पती आदिल खानच्या अफेअरमुळे राखीला धक्का बसला होता. राखीने पतीविरोधात तक्रार केल्यानंतर आदिलला ७ फेब्रुवारीला ओशिवारा पोलिसांनी अटक केली होती. आज पुन्हा आदिलला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायालयाने आदिलची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत केली आहे. राखीचा कोर्टाबाहेरील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेऱ्यासमोर राखीला अश्रू अनावर झाल्याचंही दिसत आहे. “जान, वापस आ जाओ” असं राखी व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. राखीच्या आईच्या अंत्यसंस्कारावेळीही आदिल गर्लफ्रेंडबरोबर होता, असा खुलासा व्हिडीओत राखीच्या मैत्रिणीने केला आहे.

हेही वाचा>> Video: आदिल खानला पुन्हा न्यायालयीन कोठडी, वकिलांनी दिली माहिती, म्हणाले “त्याला जामीन…”

राखीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने पती आदिलबाबत भाष्य केलं आहे. “माझ्या संपूर्ण आयुष्याची वाट लावली आहे. आदिलबरोबर लग्न झालं तेव्हा मी खूप खूश होते. मला वाटलेलं पहिल्या रमझानमध्ये मी उपवास करेन. नवरा व बाळाबरोबर उमराह यात्रा करेन. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं”, असं राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> राखी सावंत प्रकरणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, म्हणाले “आदिल खानला…”

हेही वाचा>> सलमान खानने दिलं ब्रेसलेट, गर्लफ्रेंडने गिफ्ट केली बाईक अन्…; ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन मालामाल

राखी सावंतने पती आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मारहाण व फसवणूक केल्याबरोबरच अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोपही राखीने आदिलवर केला आहे. आदिलचं अफेअर असल्याचंही राखीने उघड केलं होतं. अटक केल्यानंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला आदिलला कोर्टात हजर करण्यात आलं होत. त्यानंतर न्यायालयाने आदिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant break down in front of camera cry for husbad adil khan video kak