बॉलीवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत कायमच चर्चेत असते. गेल्यावर्षी राखीने आदिल खान दुर्रानीसह लग्न केलं होतं. पुढे काही दिवसांतच दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि राखीने घटस्फोट घेणार असल्याचं सांगितलं. यानंतर आदिल खानला अटक करण्यात आली होती. जवळपास सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर आदिलने मीडियाशी संवाद साधत अनेक गंभीर खुलासे केले. यावर राखीने पत्रकार परिषद घेत स्वत:ची बाजू मांडली. आता याप्रकरणी राखीचा भाऊ राकेश सावंतने प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : “आदिलने माझे न्यूड व्हिडीओ ५०-५० लाखांना विकले,” राखी सावंतचा पतीवर गांभीर आरोप, म्हणाली, “मी हनिमूनला…”
राखीचा भाऊ राकेश सावंत म्हणाला, “आदिलने राखीच्या आयुष्याची वाट लावली. तो नसताना राखी खूप चांगलं जीवन जगत होती. आदिलने तिला प्रचंड त्रास दिला, तो तिला मारहाण करायचा, तिचे अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकेन अशी धमकी द्यायचा. या गोष्टी मला जेव्हा कळाल्या तेव्हा मला आदिलला जाऊन मारण्याची इच्छा झाली होती.”
हेही वाचा : तेजश्री प्रधानबरोबर ‘प्रेमाची गोष्ट’ सेटवर कसं आहे नातं? शुभांगी गोखले म्हणाल्या, “तो बालिशपणा…”
“आज राखीकडे पैसा नाही…त्यामुळे तिच्याबरोबर कोणीच नाही. राखीला मीडियाच्या सहकार्याची गरज आहे. आईला कॅन्सर झाल्यावर पण, राखी नेहमी रडत राहायची. आमच्या आईच्या मृत्यूला आदिल खान जबाबदार आहे. राखीच्या शरीरावरचे डाग कोणीच नाही पाहिलेत…एवढा त्रास आदिलने तिला दिला होता.” असे गंभीर आरोप राकेश सावंतने केले आहेत. तसेच बहिणीला कायम पाठिंबा देणार असल्याचेही त्याने सांगितले.
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातसाठी सासूबाईंनी केला खास बेत, अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
दरम्यान, राखीने फेब्रुवारी महिन्यात पती आदिल खानवर फसवणुकीचे आरोप केले होते. याप्रकरणी आदिल गेले सहा महिने तुरुंगात होता. आता जामीन मिळाल्यानंतर आदिल खानने राखी सावंतवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर या संपूर्ण वादाला सुरुवात झाली आहे.