बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक साजिद खान सध्या ‘बिग बॉस १६’ मध्ये दिसत आहे. त्याची या शोमध्ये एंट्री होताच त्याच्यावर ४ वर्षांपूर्वी लावले गेलेले लैंगिक शोषणाचे आरोप पुन्हा चर्चेत आले आहेत. तो या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे ‘बिग बॉस’चे निर्माते तसेच होस्ट सलमान खान यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अनेक नामवंत व्यक्तींनी त्याला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. साजिद खानवर चहूबाजूंनी टीका होत असताना ड्रामा क्वीन राखी सावंत त्याच्या समर्थनार्थ उभी आहे. राखीने अनेकदा साजिद खानच्या बाजूने भाष्य केले आहे. आता पुन्हा इकदा साजिद खानची बाजू घेत तिने शर्लिन चोप्रावर निशाणा साधत साजिद खानच्या नाव वापरून ती प्रसिद्धी मिळवते असे म्हटले आहे.

‘बिग बॉस’च्या घरातून साजिद खानची हकालपट्टी करण्यावरुन शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात सुरू असलेला वाद संपण्याचं नावच घेत नाहीये. दोघीही एकमेकींवर गेले काही दिवस आरोप प्रत्यारोप करत आहेत. शर्लिनने राखीच्या आरोपांवर उत्तर दिल्यानंतर आता पुन्हा राखीने शर्लिनवर टीका केली आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

आणखी वाचा : लग्न न करताच बाळ होण्याबद्दल जया बच्चन यांनी केलेल्या विधानावर नात नव्याची प्रतिक्रिया; म्हणाली…

राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. राखी म्हणाली, “आपल्या देशात महिलांना खूप चांगले कायदे दिले आहेत पण अनेक महिला त्याचा गैरफायदा घेतात. महिलांनी तसे करता कामा नये. निर्दोष साजिद खान गेले अनेक दिवस एक रियालिटी शो करत आहे. तिथे असल्यामुळे त्याला माहितही नाहीये की बाहेर आपल्याबद्दल काय बोललं जातं. शर्लिन गेली पाच-सहा वर्ष गप्प बसली आणि आता अचानक साजिद खान वर आरोप करू लागली. इतकी वर्ष ती काय झोपली होती?”

पुढे ती म्हणाली, “आता आज साजिद खान बिग बॉस मध्ये असल्यामुळे त्याचे नाव वापरून शर्लिन प्रसिद्धी मिळवतेय. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि बॉलिवूडमधील एकही व्यक्ती तिच्याविरुद्ध बोलायला उभी राहत नाहीये. कारण ही मंडळी समाजाला घाबरतात. पण मी कोणालाही घाबरत नाही. मी एक समाजसेविका आहे आणि आपल्या देशातील सगळ्यांसाठीच माझ्या मनात प्रेम आहे. म्हणूनच मी त्यांच्या बाजूने लढण्यासाठी पुढे आले आहे.”

हेही वाचा : “तो मला रोज मारतो”, राखीने खुलासा करताच आदिल म्हणाला, “ती…”

शर्लिनने साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून साजिदची हकालपट्टी करण्यासाठी तिने पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही शर्लिनने पत्र लिहिलं होतं. यावरुन राखीने साजिद खानचं समर्थन करत शर्लिनवर गंभीर भाषेत टीका केली होती.

Story img Loader