‘बिग बॉस’च्या घरातून साजिद खानची हकालपट्टी करण्यावरुन शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात सुरू झालेला वाद संपण्याचं नावच घेत नाहीये. शर्लिनने राखीच्या आरोपांवर उत्तर दिल्यानंतर आता पुन्हा राखीने शर्लिनवर टीका केली आहे.
राखीने शर्लिनवर टीका करताना तिचा चेटकीण असा उल्लेख केला आहे. “राक्षसाचा वध करण्यासाठी देवी अवतार घेते. तसंच प्रत्येक चेटकीणाला मारण्यासाठी राखीचा जन्म झाला आहे. हा मी जाड आहे. तू बॉडी शेमिंगबद्दल बोललीस तरी मला काही फरक पडत नाही. माझे ५० बॉयफ्रेंड आहेत तर काय करशील तू? मी जाड असूनही माझ्याकडे खूप काम आहे”, असं राखी पापाराझींना म्हणाली. तिचा हा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.
हेही वाचा >> विराट कोहलीचा बेडवरील ‘तो’ फोटो पोस्ट करत अनुष्काने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…
हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कॅबिनेट मंत्र्याचं सुबोध भावेला पत्र, म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका…”
शर्लिनने साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून साजिदची हकालपट्टी करण्यासाठी तिने पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही शर्लिनने पत्र लिहिलं होतं. यावरुन राखीने साजिद खानचं समर्थन करत शर्लिनवर गंभीर भाषेत टीका केली होती. “ही मुलगी रोज उठून चार किलोचा मेकअप करुन मीडियासमोर येते. कधी साजिद तर कधी राज कुंद्रावर आरोप करते. सहा महिन्यांनी अजून कोणावर तरी बलात्काराची केस दाखल करेल”, असं राखी म्हणाली होती.
हेही पाहा >> Photos: …म्हणून दुबईत असतानाच विराट झाला ‘अलिबागकर’; जाणून घ्या नेमकं काय घडलं
राखीच्या या आरोपांवर शर्लिनने उत्तर दिलं होतं. “राखी सावंत काय करते? ३१ किलोचा मेकअप करुन आलिशान हॉटेलमध्ये जाऊन खासगी कामं करते आणि करुनही घेते. भाड्याने बॉयफ्रेंड आणि नवरा आणते. एका वर्षात त्यांना कंगाल करते आणि सोडून देते”, असं शर्लिनने म्हणाली होती.