बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मे महिन्यात अचानक राखीची प्रकृती खालावली होती आणि तिच्या गर्भाशयात ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. यादरम्यान राखीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं होते.

एका बाजूला राखीची प्रकृती बिघडली होती. आता २ महिन्यानंतर राखीने तिच्या प्रकृतीबद्दल खुलासा केला आणि ती कधीच आई होऊ शकणार नाही असं सांगितलं.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

नुकत्याच टेली टॉकला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली, “खूप वेदना आहेत आयुष्यात पण आता त्याचा सामना करावाच लागेल. मी आता कधीच आई होऊ शकत नाही. आता मी सरोगसीचा विचार करेन. कारण मी मुलाला दत्तक नाही घेऊ शकत.”

हेही वाचा… “विराटकडे ऑटोग्राफ मागणार होतो पण…”, ‘या’ अभिनेत्याने सांगितला किंग कोहली आणि त्याच्या पहिल्या भेटीचा किस्सा, म्हणाला…

राखी पुढे म्हणाली, “मी विकी डोनरसारख काहितरी प्लॅन करेन. वारसा चालवायला कोणतरी हवं ना आयुष्यात.” राखीने असंही सांगितलं की, तिच्या पोटात दहा सेंटीमीटरचा ट्यूमर सापडला. सर्जरी करून डॉक्टरांना पूर्ण गर्भाशय काढावं लागलं आणि यामुळेच ती आई होऊ शकणार नाही. तरी, डॉक्टरांना आधी असं वाटलं होतं की, राखीला हृदयविकाराचा झटका आला आहे पण तपास केल्यानंतर तिच्या ट्यूमरबद्दल कळलं.

राखीने या गोष्टीचा सगळा दोष तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीवर टाकला आणि सांगितलं की, त्याने मला उद्ध्वस्त केलं. राखी म्हणाली की, “त्याने माझा फोन हॅक केला, स्वत:चे न्यूड व्हिडीओ लीक केले आणि माझ्यावरच केस टाकली. माझे सगळे पैसे तो घेऊन गेला. त्यानेच माझी बदनामी केली.”

हेही वाचा… मनीषा कोईरालाला एका प्रसिद्ध फोटोग्राफरने बिकिनी घालण्यासाठी केला होता आग्रह; अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली, “मी घातलेल्या संपूर्ण कपड्यांवर…”

राखीने आदिलबरोबर निकाह करण्यासाठी स्वत:चा धर्मदेखील बदलला होता. तिने आपलं नाव बदलून फातिमा ठेवलं होतं, पण आदिलने तिला धोका दिला असं तिचं म्हणणं आहे.

हेही वाचा… “१५० रुपयांची बनियन…”, अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यातील लूकमुळे जस्टिन बीबरला केलं जातंय ट्रोल; नेटकरी म्हणाले…

दरम्यान, राखीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर आदिल खानच्या आधी राखीनं रितेशशी लग्न केलं होतं. या दोघांनी ‘बिग बॉस १५’ मध्ये सहभाग घेतला होता; पण काही कारणांमुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये शो संपल्यानंतर ते दोघं लगेचच वेगळे झाले. रितेशपासून विभक्त झाल्यानंतर राखीनं आदिल खानशी लग्न केलं. परंतु, २०२३ मध्ये दोघं वेगळे झाले. नंतर आदिलने अभिनेत्री सोमी खानशी गुपचूप लग्न केलं.

Story img Loader