राखी सावंतचा पती आदिल खानबरोबर वाद झाला आहे. राखीने आदिलवर मारहाणीचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी अंधेरी कोर्टाने सुनावली. आदिल कोठडीत असला तरी राखी मात्र सातत्याने त्याच्यावर नवनवीन आरोप करत आहे. त्याचं पहिलं लग्न झालं होतं, असा खुलासा तिने केला, तसेच त्याचं अफेअर असून त्याच्या गर्लफ्रेंडचं नावही सर्वांसमोर सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुपरहिट चित्रपटातून पदार्पण, आईबरोबर अफेअरची अफवा अन् घटस्फोट! ‘आशिकी’ फेम अभिनेत्याचा हिरो ते झिरो प्रवास

आदिलचं तनू नावाच्या मुलीबरोबर अफेअर असल्याचं राखीने म्हटलं होतं. त्यानंतर आता नव्या व्हिडीओत राखीने तनूवर सडकून टीका केली आहे. राखी म्हणाली, “तनू, निवेदिता चंडाल, तुझ्या नावातच चंडाल आहे. निवेदिता तू माझं घर तोडलंस, माझं हृदय तोडलंस, मी तुला शाप देते की जे तू माझ्याबरोबर केलंस, तेच तुझ्याबरोबर होवो,” असं राखी म्हणाली.

यावेळी बोलताना राखी रडू लागली आणि आदिलचा उल्लेख करत म्हणाली, “जो पत्नीचा होऊ शकला नाही, तो तुझाही नाही होणार”.

दरम्यान, राखी बिग बॉस मराठीमध्ये गेल्यानंतर आदिलचं तनूशी सूत जुळल्याचा आरोप तिने केला होता. त्यामुळेच राखीने आपल्या लग्नाची बातमी सर्वांना सांगितली. तसेच फोटो व व्हिडीओही शेअर केले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant curses adil khan girlfriend tanu aka nivedita chandel hrc