कलाविश्वातील सर्वाधिक मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा करण्यात आलीय. यंदाच्या ऑस्करमध्ये भारताने दोन पुरस्कारावर नाव कोरलं. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या शॉर्ट फिल्मला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला. तर सर्वांना उत्सुकता असलेल्या आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने बेस्ट ओरिजिनल साँग या पुरस्कारावर अखेर नाव कोरलं. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर राखीने या गाण्याच्या हूक स्टेपवर व्हिडीओ बनवला आहे. ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका व्यक्तीला ‘नाटू नाटू’च्या हूक स्टेप्स शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

हेही वाचा>> Oscars Awards 2023 : ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाला ऑस्कर, जाणून घ्या कोणत्या श्रेणीत मिळाला पुरस्कार

हेही पाहा>> Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणचा ऑस्करसाठी ग्लॅमरस लूक, मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष

राखीच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. “अकॅडमी दुबईवरुन इथे शिफ्ट झाली का?”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “आदिल करेल नाटू नाटू”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “दीदी राहू दे, त्यांना माहीत पडलं की कोरिओग्राफर तू आहेस, तर अवॉर्ड परत घेतील”, अशी कमेंटही केली आहे.

हेही वाचा>> Video: ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक, अभिनेत्रीचे डोळे पाणावले अन्…; व्हिडीओ व्हायरल

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा चित्रपट मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होत. केवळ देशातच नाही तर जगात या चित्रपटाने डंका वाजवला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने चाहत्यांना भूरळ पाडली. या गाण्यावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Story img Loader