बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल राखी सावंत कायमच चर्चेत असते. राखीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पती आदिल खान प्रकरणामुळे राखी चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा राखीचा ड्रामा पाहायला मिळत आहे. राखीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. राखीने ‘शराबी’ या गाण्याच्या इव्हेंटसाठी हजेरी लावली होती. या इव्हेंटसाठी राखीने खास लूक केला होता. लाल व काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घालून राखी हॉट दिसत होती. या कार्यक्रमात राखीने ‘शराबी’ गाण्यावर डान्सही केला. भर कार्यक्रमात राखीने दारुचा ग्लास डोक्यावर घेत डान्स केला. त्यानंतर ती ग्लासमधील दारूही प्यायली.

हेही वाचा>> “मुंबई-महाराष्ट्रात…”, प्राजक्ता माळीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…

राखीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत राखीने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. “अनेक मुस्लीम लोक दारू पितात. पण मी कधीच दारू पित नाही. त्यामुळे माझ्याबद्दल मत बनवू नका. शराबी हे गाणं होतं, त्यामुळे दारूचा ग्लास घेऊन मी डान्स केला. मी इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे मला काहीतरी वेगळं करायचं होतं,” अशी कमेंट राखीने केली आहे.

हेही वाचा>> मराठमोळ्या बॉडीगार्डच्या लग्नाला पोहोचला कार्तिक आर्यन, फोटो शेअर करत म्हणाला…

राखी सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. पती आदिल खानला तुरुंगात टाकल्यानंतर राखीने दुबईत तिची डान्स अकॅडमी सुरू केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant drink and dance in event video goes viral on internet kak
Show comments