Rakhi Sawant in Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व रंजक वळणावर पोहोचले आहे. या शोचा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. आता आजच्या भागात या शोमध्ये दोन जुन्या पर्वातील स्पर्धकांची एंट्री होणार आहे. एक म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंत आणि दुसरा अभिजीत बिचुकले. कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये राखी सावंतची एंट्री पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक फारच खूश झाले आहेत.

निक्की तांबोळीचं घरात वागणं पाहून तिला उत्तर देण्यासाठी राखी सावंत ही योग्य स्पर्धक असल्याचं प्रेक्षक सुरुवातीपासून म्हणत होते. अखेर राखीची घरात एंट्री झाली आहे. मुख्य म्हणजे राखी आल्यावर निक्कीलाच टार्गेट करताना दिसते, ज्यामुळे तिचा चेहरा पडतो. शोचा हा नवीन प्रोमो आल्यावर यावर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

“बाईSS…”, म्हणत ‘बिग बॉस’च्या घरात आली राखी सावंत! निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला; ताज्या झाल्या ४ वर्षांपूर्वीच्या आठवणी

निक्कीची एंट्री अन् डायलॉगबाजी

राखी सावंत घरात एंट्री करताच म्हणते, “हॅलो बिग बॉस.. आय अॅम बॅक.. तुमची पहिली बायको.” यावर निक्की “हाय रब्बा” म्हणताना दिसते. नंतर राखी निक्कीजवळ जाते आणि म्हणते, “निक्की.. सस्ती राखी सावंत..” पुढे राखी जान्हवी, निक्की आणि अभिजीत बसलेल्या सोफ्याजवळ जाते आणि उडी मारून म्हणते, “आता घरात चालणार आहे माझं ठणाणाणा…निक्की तांबोळी तुला सोडून येणार मी आंबोली..” असा डायलॉग राखी म्हणते. यानंतर निक्कीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्ण बदलतात.

Bigg Boss Marathi: “माझा साखरपुडा…”, निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

‘निक्की तांबोळीची बोलती बंद करणार राखी’, ‘चला शेवट तरी गोड होतोय… शेवटी शेवटी राखीला आणल्यावर राख तरी होणार नाही टीआरपीची,’ ‘राखी शिवाय बिग बॉस पूर्ण होऊच शकत नाही’, ‘निक्की तांबोळी सोडून येणार तुला आंबोली…’, ‘फुल्ल राडा केलाय बिग बॉसने,’ ‘हीच वाट बघत होते..निक्की बाईईईईईईई काय प्रकार’, ‘राखीला घरवाल्यांचा माज उतरवण्यासाठी प्रत्येक सिझनमधे वाइल्डकार्ड आणलं पाहिजे’, ‘राखी vs निक्की यांचे शत्रुत्व खूप जुने आहे. बिग बॉस १४ पासून’, ‘बाई हा काय प्रकारला लागणार फुल्ल स्टॉप’ अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

netizens reaction on rakhi sawant entry in bigg boss marathi
राखीच्या एंट्रीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (फोटो – स्क्रीनशॉट)
netizens reaction on rakhi sawant entry in bigg boss marathi (1)
राखीच्या एंट्रीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (फोटो – स्क्रीनशॉट)

राखी सावंत व अभिजीत बिचुकले यांची घरात एंट्री झाली आहे. आजच्या भागात हे दोघे घरात काय गोंधळ घालणार, कोणाला सपोर्ट करणार आणि कोणाला टार्गेट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Story img Loader