राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. लोकप्रिय अभिनेत्री व ‘बिग बॉस १२’ फेम सोमी खानशी त्याने जयपूरमध्ये दुसरं लग्न केलं आहे. लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने ३ मार्च रोजी कुटुंबियांच्या उपस्थितीत सोमीशी निकाह केला.
आदिल खानने त्याच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आदिल म्हणाला, “हे माझं पहिलं लग्न आहे. आम्ही सध्या बेंगळुरूमध्ये आहोत. लवकरच मुंबईला जाऊ. लग्नाबाबत आम्ही दोघेही अधिकृत घोषणा करणार आहोत. मी लवकरच सर्व काही शेअर करेन.”
राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने केलं दुसरं लग्न, कोण आहे त्याची दुसरी पत्नी? जाणून घ्या
दरम्यान, आदिल खान व राखी सावंत यांनी २०२२ मध्ये लग्न केलं होतं, पण हे लग्न त्यांनी लपवून ठेवलं होतं. डिसेंबरमध्ये राखीने लग्नाचे फोटो शेअर करत इस्लाम धर्म स्वीकारून आदिलशी लग्न केल्याचा खुलासा केला होता. इतकंच नाही तर तिने तिचं नावही फातिमा ठेवलं होतं. लग्नाबद्दल माहिती सार्वजनिक केल्यानंतर आदिल व राखीची भांडणं होऊ लागली. तिने त्याच्याविरोधात मारहाण व फसवणुकीची तक्रार दिली आणि पोलिसांनी आदिलला अटक केली. त्यानंतर सहा महिन्यांनी त्याची सुटका झाली होती.
तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने राखीवर गंभीर आरोप केले होते. दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते, तसेच राखीने आदिलपासून घटस्फोट घेतल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता आदिलने सोमीशी लग्न केलंय. ती जयपूरची असून आता मुंबईत राहते. ‘न्याय’, ‘केसरिया बालम’ आणि ‘हमारा हिंदुस्तान’ यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये सोमीने काम केलं आहे.