बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत लग्नबंधनात अडकली आहे. राखीने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. राखी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. घरातील टॉप ५ सदस्यांमध्ये राखीने स्थान मिळवलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच राखी व बॉयफ्रेंड आदिल खानने कोर्ट मॅरेज केल्याची चर्चा आहे. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी व आदिल एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहे.

हेही वाचा>> “तीन वर्ष ज्या सैनिकांबरोबर…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची खास पोस्ट

हेही वाचा>> ‘बिग बॉस मराठी ४’चा विजेता कोण ठरणार, हे अमृता धोंगडेला आधीच माहीत होतं; म्हणाली…

राखी सावंतने आता नव्हे तर सात महिन्यांपूर्वीच लग्न केल्याचं समोर आलं आहे. राखीने स्वत:च याचा खुलासा केला आहे. तिच्या व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या फोटोंमधील मॅरेज सर्टफिकेटवर २९ मे २०२२ अशी लग्नाची तारीख आहे. त्यामुळे राखीने सात महिन्यांपूर्वीच लग्न केलं आहे.

हेही वाचा>> “१०-१२ दिवस…”; राखी सावंतशी लग्नाबद्दल आदिल खानची पहिली प्रतिक्रिया, अभिनेत्रीनेही केला नवीन खुलासा

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने तिची आई रुग्णालयात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लगेच दोनच दिवसांत राखीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे चाहतेही संभ्रमात होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant got married to aadil khan video goes viral kak