नेहमी चर्चेत असणारी कॉन्ट्रोव्हर्शियल अभिनेत्री राखी सावंत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मीडियासमोर सगळ्यांचं मनोरंजन करणारी राखीची प्रकृती अचानक बिघडली आहे. राखीला नुकतंच एका रुग्णालयात दाखल केलंय. हृदयाशी संबंधित असलेल्या आजारामुळे तिला काल तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या माहितीमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखीचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोमध्ये राखी रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसतेय.परिचारिका तिचं ब्लड प्रेशरदेखील तपासताना या फोटोत पाहायला मिळतंय. तिच्या एका बोटाला पल्स ऑक्सिमीटरदेखील लावलेला दिसतोय. राखीला नक्की काय झालंय याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

हेही वाचा… VIDEO: “माझी उंची लहान…”, १९ वर्षीय अमीराशी लग्नाचा घाट घातलेल्या अब्दू रोजिकला केलं जातंय ट्रोल, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

विरल भयानी या पापाराझी सोशल मीडिया अकाउंटवरून हे फोटो व्हायरल झाले. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, “हृदयाशी संबंधित काही आजारामुळे राखीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावं लागंल असं दिसतंय. डॉक्टरांकडून पुढील माहिती येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. ती लवकर बरी व्हावी अशी आमची इच्छा आहे.”

राखीच्या व्हायरल झोलेल्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “कृपया तिला वाचवा”, तर दुसऱ्याने लिहिलं, “राखी लवकर बरी हो.” काही जणांना राखीचं रुग्णालयात दाखल होणंदेखील एक पब्लिसिटी स्टंट वाटतोय. यामुळे एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं की, “हिच्यावर विश्वास ठेवणं थोडं अवघड आहे”, तर एका युजरने लिहिलं की, “नक्कीच ही खोटी बातमी असणार, राखी पूनम पांडेसारखा पब्लिसिटी स्टंट करतेय.”

हेही वाचा… अक्षय कुमारने केलेली ट्विंकलची गायीशी तुलना; अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली…

याआधी राखीने एका कार्यक्रमाला लाल रंगाचे टॉवेल परिधान करून हजेरी लावली होती. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अमेरिकन गायिका दोजा कॅटने मेट गाला २०२४ च्या रेड कार्पेटसाठी सफेद टॉवेलची निवड केली होती. दोजाचा हा लूक चर्चेत होता. या लूकची प्रेरणा घेत राखीनेदेखील तिच्या हटके अंदाजामध्ये लाल टॉवेल, सिल्वर ज्वेलरी आणि गुलाबांचा वापर करत एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती.

हेही वाचा… “नेटफ्लिक्स अडल्ट आणि गलिच्छ…”, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’बद्दल कॉमेडीयन सुनील पालची टीका, म्हणाला…

दरम्यान, राखीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर ऑक्टोबर २०२१ मध्ये राखी सावंतने जेव्हा बिग बॉस १५ च्या घरात प्रवेश केला, तेव्हा तिने तिचा पती रितेशशी ओळख करून दिली होती. तथापि, शोच्या ग्रँड फिनालेनंतर म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये काही कारणांमुळे दोघं वेगळे झाले. रितेशपासून विभक्त झाल्यानंतर राखीने आदिल खानशी लग्न केलं. परंतु, २०२३ मध्ये बिग बॉसफेम आदिलवर अनेक आरोप लावल्यानंतर दोघं वेगळे झाले. नंतर आदिलने अभिनेत्री सोमी खानशी गुपचूप लग्न केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant hospitalized due to heart related issue photos viral dvr