बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राखी व बॉयफ्रेंड आदिल खान सात महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झाले आहेत. २९ मे २०२२ रोजी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं असल्याचं समोर आलं आहे. राखीनेच याबाबत खुलासा केला आहे. आदिलने लग्न केल्याचं लपवून ठेवण्यास सांगितलं असल्याचं राखी म्हणाली.
राखी व आदिलचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. परंतु, आदिल खानने राखीबरोबर लग्न केलं असल्याच्या चर्चांवर अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. राखीशी लग्नाच्या चर्चांबाबत दहा दिवसांनी खुलासा करणार असल्याचं आदिलने एका मुलाखतीत सांगितलं आहे. याच दरम्यान राखीच्या वकिलांना तिच्या लग्नाबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा>> “साताऱ्याच्या वाघाने…”, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच किरण मानेंनी शेअर केलेला फोटो चर्चेत
राखीच्या वकिलाने टेली मसालाशी बोलताना या विषयावर भाष्य केलं. “राखी सावंत व आदिल खानचं लग्न खरंच झालं आहे. त्यांचा निकाह आधीच झाला होता. त्यानंतर त्यांनी कोर्ट मॅरेज केलं”, असा खुलासा राखीच्या वकिलांनी केला आहे. लग्न झाल्याचं लपवण्याचा निर्णयही दोघांचा असल्याचं राखीचे वकील म्हणाले. “राखी व आदिलच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओही समोर आले आहेत. ते तर खोटे असू शकत नाहीत”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा>> अथिया शेट्टी व के.एल. राहुलच्या लग्नाची गेस्ट लिस्ट समोर, कोणते सेलिब्रिटी लावणार हजेरी?
“निकाह झाल्यानंतर कोर्ट मॅरेज करण्यासाठी आदिलने पुढाकार घेतला होता. आदिलने लग्न नाकारल्यामुळे राखी टेन्शनमध्ये आहे. पण, आता राखीबरोबरचं लग्न नाकारुन काहीही फायदा होणार नाही. यावरुन फक्त त्याच्या फायद्यासाठी तो राखीला भेटला होता आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर आदिलला आता माघार घ्यायची आहे, असं दिसत आहे”, असं राखीच्या वकिलांनी म्हटलं आहे.