ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत ही दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाली आहे. तिने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर निकाह केल्याचे बोललं जात आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. त्या दोघांचा निकाह २९ मे २०२२ ला झाला असून त्यांनी २ जुलै २०२२ ला लग्नाचे रजिस्ट्रेशन केले आहे. राखी सावंतने तिच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. आता राखी सावंतने तिला लव्ह जिहादची भीती वाटत असल्याचे बोललं जात आहे.
राखी सावंतने इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आदिल आणि राखी यांच्या गळ्यात वरमाळा आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. राखी आणि आदिलचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. नुकतंच राखीने तिच्या लग्नाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावेळी राखी म्हणाली, “काही महिन्यांपूर्वी मी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. त्यावेळी बाहेर अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यांचं एका दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर सुरु आहे. त्यामुळेच मी माझ्या लग्नाचे गुपित सर्वांसमोर उघडं केलं आहे. मी याबद्दल योग्य वेळी बोलेनंच. पण आता मला माझे लग्न वाचावायचे आहे.”
आणखी वाचा : गळ्यात वरमाला, हातात मॅरेज सर्टिफिकेट; नवविवाहित राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?
“मी आणि आदिलने लग्न केलंय हे जगाला समजायला हवं. मला खूप त्रास होत आहे. त्यामुळेच माझ्या लग्नाबद्दल मी जाहीरपणे सांगून टाकलं आहे. आमचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालंय. आम्ही आधी कोर्टात लग्न केलंय आणि त्यानंतर निकाह केला. आदिलनं मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे मी या लग्नाबद्दल ७ महिने लपवून ठेवलं. पण आता आदिल माझ्याशी बोलत नाही. त्याने माझ्याबरोबर विश्वासघात केला आहे.
मला आता लव्ह जिहादची भीती वाटू लागली आहे. कारण आदिलचे कुटुंबिय त्याच्यावर खूप दबाव टाकत आहेत. त्यामुळे तो माझ्याशी बोलत नाही. त्याबरोबरच आदिलचे दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरु आहे”, असेही राखी सावंतने म्हटले.
आणखी वाचा : “मी बिग बॉसमध्ये असताना तो दुसऱ्या…” राखी सावंतचे आदिलवर गंभीर आरोप
दरम्यान राखीच्या लव्ह लाइफची नेहमीच चर्चा होताना दिसते. राखीनं २०१९ मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेशबरोबर लग्न केलं होतं. ते दोघे बिग बॉसच्या रिअॅलिटी शो मध्येही दिसले होते. पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली.