राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी सध्या पोलीस कोठडीत आहे. राखीने त्याच्याविरोधात फसवणूक व मारहाणीचे आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. राखीच्या आरोपांनंतर म्हैसूरमध्ये शिकणाऱ्या एका इराणी तरुणीनेही आदिल खानने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. राखी दोन दिवसांपूर्वी म्हैसूरला गेली होती, यावेळी तिने आदिल खानच्या घरी भेट दिली, तसेच त्या पीडितेची भेटही तिने घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेबरोबरच्या ‘त्या’ रोमँटिक फोटोवर अखेर स्नेहल शिदमने सोडलं मौन; म्हणाली…

राखी सावंतने पीडितेची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. “मी त्या पीडित मुलीला भेटले. तिने मला सर्व पुरावे दाखवले. ते पाहून मला धक्का बसला आणि माझी प्रकृती बिघडली. मला कोर्टाबाहेर चक्कर आली होती. आदिल सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि आम्ही सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. आदिल खूप खोटं बोलतोय. त्याचे फोन अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. पोलिसांना त्याचे फोन माझ्याजवळ असल्याचे तो सांगतोय. म्हैसूर पोलिसांना ओशिवरा पोलिसांनी फोन घेतल्याचं सांगतोय, तर ओशिवरा पोलिसांना म्हैसूर पोलिसांकडे फोन असल्याचं सांगतोय,” असा खुलासा राखी सावंतने केला.

Video: “हे असले चाळे…” ‘त्या’ व्हिडीओमुळे ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल

“आदिल खानचे दोन फोन आहेत. त्या फोनमध्ये सर्व मुलींबरोबर दुष्कृत्य करतानाचे अश्लील व्हिडीओ आहेत. मी पोलीस स्टेशनमध्ये त्याचा इराणी मुलीबरोबरचा व्हिडीओ पाहिला. तो व्हिडीओ पाहून मला धक्का बसला. एखादा माणूस आपले खासगी क्षण अशाप्रकारे कसे शूट करू शकतो,” असं राखी म्हणाली. यावेळी पोलीस त्याच्याशी कठोरतेने का वागत नाहीत, असा प्रश्न पडत असल्याचंही तिने सांगितलं. ओशिवरा पोलिसांनी चार दिवस कोणती चौकशी केली हे कळत नसल्याचंही राखी म्हणाली.

“मला फक्त न्याय हवा आहे आणि त्यासाठी पोलिसांना आदिल खानचे फोन शोधावे लागतील. कारण त्याच्या फोनमध्ये सर्व पुरावे आहेत, पोलिसांनी लोकांच्या सेवेची शपथ घेतली आहे, त्यामुळे त्यांनी चांगल्या रितीने तपास करावा,” असं राखी म्हणाली.