ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिचा पती आदिल खान दुर्रानी सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरुंगातून जामीनावर सुटलेल्या आदिलने त्याच्या वकिलाबरोबर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने राखीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीने आपले न्यूज व्हिडीओ बनवले, तिने ड्रग्ज दिले, असं आदिल म्हणाला होता. या सर्व आरोपांवर राखीने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राखीने मला ड्रग्ज दिले”, आदिल खानचा धक्कादायक दावा; म्हणाला, “माझा न्यूड व्हिडीओ…”

राखीने पहिल्या पतीपासून घटस्फोट न घेताच आपल्याशी लग्न केल्याचा दावा आदिल खानने केला. काही महिन्यांपूर्वी दोघांचा वाद झाला तेव्हा आपला गर्भपात झाल्याचं राखी म्हणाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करून तिचे गर्भाशय काढून टाकण्यात आले आहे, त्यामुळे ती आई होऊ शकत नाही असं आदिल खानने म्हटलं आहे. आदिलच्या सर्व आरोपांवर राखीची प्रतिक्रिया समोर आली आहे. राखीने आदिलवर पलटवार केला आहे. आपण सर्व पुरावे देणार असल्याचं राखी सावंतने म्हटलं आहे.

‘ई-टाइम्स’शी बोलताना राखी सावंत म्हणाली, “तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या समोर येईन. सध्या मी जरा व्यग्र आहे. पण मी सर्व पुरावे घेऊन माध्यमांसमोर येईन आणि त्याचा पर्दाफाश करेन. मी लवकरच काही व्हिडीओ सर्वांसमोर आणेन आणि सगळे खुलासे करेन. मी या माणसाचा पर्दाफाश करेन. त्याचे व्हिडीओ पाहून संपूर्ण देशाला धक्का बसेल.”

Video: आदिल खान सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर, राखी सावंतला दिला इशारा; म्हणाला, “माझ्याबरोबर जे घडलं…”

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात राखीने पती आदिल खानवर मारहाणीचे व फसवणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर आदिलला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर म्हैसूरमधील एका तरुणीनेही अत्याचाराचा आरोप केला होता. दोन्ही प्रकरणात आदिल गेले सहा महिने तुरुंगात होता. आता जामीन मिळाल्यानंतर तो राखीने त्यावेळी केलेल्या आरोपांना उत्तर देत नवनवीन खुलासे करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant reaction on adil khan durrani allegations about giving drugs to him and nude video hrc