बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्याने ‘बिग बॉस १२’ फेम सोमी खानशी निकाह केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटोही शेअर केले आहेत. आदिलने सोमीआधी राखीशी लग्न केलं होतं, पण ते वर्षभरातच विभक्त झाले. राखीने आदिलवर फसवणूक व घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. अशा परिस्थितीत राखीने आता आदिलच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली असून याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आदिल आणि सोमीच्या लग्नाबद्दल राखी सावंतने ‘इ-टाइम्स’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. “होय हे खरं आहे, आदिलने लग्न केलं आहे, त्यांच्याकडे कोर्ट मॅरेज सर्टिफिकेटही आहे. पण मला त्याच्या लग्नाबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण तो पूनम पांडेप्रमाणे त्याच्या व्हिडीओ रिलीजसाठी पब्लिसिटी स्टंट करत आहे आणि लवकरच त्यामागचं सत्य समोर येईल,” असं राखी सावंत म्हणाली.

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने केलं दुसरं लग्न, कोण आहे त्याची दुसरी पत्नी? जाणून घ्या

दरम्यान, आदिलने लग्नाचे फोटो शेअर केल्यावर राखी सावंतने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यात तिने आदिलचा उल्लेख केला नव्हता, पण तशीच सूचक पोस्ट होती. तसेच तिने सहन केलेला त्रास, फसवणूक या गोष्टींचा उल्लेखही तिने पोस्टमध्ये केला होता.

आदिल खानने ३ मार्च रोजी सोमी खानशी लग्न केलं. त्याने ७ मार्च रोजी लग्नाचे फोटो शेअर केले होते. “आमचा निकाह एका साध्या आणि सुंदर समारंभात पार पडला हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. पती-पत्नी या नात्याने आमचा नवा प्रवास सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सुखी वैवाहिक जीवनासाठी कृपया आमच्यासाठी पार्थना करा,” असं आदिलने फोटोंबरोबर लिहिलं होतं.