अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने पती आदिल खानचं अफेअर असल्याचं उघड करत त्याच्या कॅमेऱ्यासमोरच त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव जाहीर केलं होतं. त्यानंतर फसवणूक व मारहाण केल्याचे गंभीर आरोप करत राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केली होती. राखीच्या तक्रारीनंतर ओशिवारा पोलिसांनी आदिलला ७ फेब्रुवारीला अटक केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अटक झाल्यानंतर आदिलचा हॉटेलमधील एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याने राखी सावंतकडे असलेल्या गाड्यांबाबत माहिती दिली होती. राखी सावंतच्या मालकीच्या गाड्यांचा पाढा आदिलने वाचून दाखवला होता. त्यातीलच एका गाडीबरोबरचा राखीचा व्हिडीओ समोर आला आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> Video: नाईट सूटमध्ये नमाज केल्यामुळे राखी सावंत ट्रोल, नेटकरी म्हणाले “नेलपेंट लावून…”

राखीच्या मालकीची व्हिडीओतील गाडी आदिलकडे होती. या गाडीची चावी राखीकडे होती, असं ती व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. या गाडीच्या काचेवर आदिल खानचं नावही लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर राखीने आदिलच्या नावाचं स्टिकर गाडीवरुन काढून टाकलं आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’ विजेता एमसी स्टॅनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडून मिळाली ऑफर

दरम्यान, अटक केल्यानंतर न्यायालयाने आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारीला आदिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी(२० फेब्रुवारी) पुन्हा आदिलची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आदिलवर म्हैसूरमध्येही बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने म्हैसूर पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant removed husband name from her car video viral kak