बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा पती आदिल खान दुर्रानी जेलमधून काही दिवसांपूर्वीच बाहेर आला. ६ महिन्यांनंतर म्हैसूरच्या जेल बाहेर येताच आदिलनं थेट मुंबई गाठून काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं ड्रग्ज देण्यापासून ते न्यूड व्हिडीओ काढण्यासह अनेक गंभीर आरोप राखीवर लावले. त्यानंतर आज राखीनं पत्रकार परिषद घेऊन आदिलनं केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या तिचा पत्रकार परिषदेतला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये ती आदिलनं मारझोड करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याचं बोलताना दिसतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “…म्हणून आदिल मला टार्गेट करतोय”; राखी सावंतने सांगितली कारणे, म्हणाली…

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’नं इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी म्हणतेय की, “माझ्याकडे आईचे उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. मी या भावाला सांगितलं, ज्यानंतर माझ्या आईच्या उपचारासाठी मदत मिळाली. आदिलला बिग बॉसमध्ये जायचं आहे. त्याला स्टार बनायचं आहे. आदिल तू दोन-तीन सी-ग्रेडचे चित्रपट करशील, पण इंडस्ट्रीत कसं टिकून राहायचं असतं हे मला चांगलं माहित आहे. तू जास्त काळ टिकणार नाहीस, गायब होशील.”

हेही वाचा – तेजश्री प्रधानबरोबर ‘प्रेमाची गोष्ट’ सेटवर कसं आहे नातं? शुभांगी गोखले म्हणाल्या, “तो बालिशपणा…”

पुढे राखी म्हणाली की, “८ महिन्यांच्या या वैवाहिक जीवनात आदिलनं मला खूप मारलं आहे. शेवटी मी एक महिला आहे. सुरुवातीला यानं मारझोड करून इस्लाम स्वीकारायला लावला. त्यानंतर त्यानं दोन घटस्फोट माझ्या तोंडावर फेकून मारले आणि तिसरा अजून दिला नाही.”

हेही वाचा – बिग बॉस फेम अभिनेत्याने केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक, फोटो शेअर करत म्हणाला…

दरम्यान आदिलच्या ड्रग्जच्या आरोपावर राखीची वकील म्हणाली की, “म्हैसूरमध्ये ६ हून अधिक गुन्हे आदिल खान विरोध दाखल आहेत. रेप व्यतिरिक्त फसवणुकीसंदर्भातही गुन्हे दाखल आहेत. आता आदिलनं पुन्हा एकदा जेलमध्ये जाण्यासाठी मार्ग खुला करून दिला आहे. त्यानं काही गोष्टी बोलून न्यायालयाचा अवमान केला आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant revealing facts about husband adil khan and says me adopt islam forcefully pps