‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे काहीच आठवडे शिल्लक आहेत. राखी सावंतने घरात एन्ट्री घेतल्यापासून ती काहीतरी करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. एंटरटेनमेंटचं फूल टू पॅकेज असलेली राखी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस हिंदी’च्या १५व्या पर्वातही राखी सहभागी झाली होती. या पर्वात अभिजीत बिचुकले व नुकतीच लग्नबंधनात अडकलेली देवोलिना भट्टाचार्जीही सहभागी झाले होते. राखीने ‘बिग बॉस’च्या घरात बिचकुले व देवोलिनाच्या आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, “अभिजीत बिचुकले ‘बिग बॉस’च्या घरात तो दिवसभर झोपून असायचा. कोणत्याही टास्क किंवा खेळात तो सहभाग घ्यायचा नाही”.

हेही वाचा>>“माझ्या तोंडातून बासुंदीचा सुगंध येतो”, राखी सावंतने सांगितला अभिजीत बिचुकलेचा ‘तो’ किस्सा

पुढे राखी म्हणाली, “अभिजीत बिचुकलेची घरातील सगळी कामे देवोलिना भट्टाचार्जी करायची. त्याच्यासाठी ती जेवणही बनवायची. पण, बिचुकलेने नॉमिनेशन टास्कमध्ये सर्वात आधी तिलाच नॉमिनेट केलं होतं. मी तुमची बेस्ट फ्रेंड आहे, तुमचे कपडे मी धुतले आहेत. तुम्ही मलाच का नॉमिनेट करताय, असं देवोलिना बिचुकलेला म्हणाली. यावर बिचुकले तिला मग काय झालं, मी तुलाच नॉमिनेट करणार. तू घराच्या बाहेर जा”.

हेही वाचा>> Video: समीर चौगुलेंच्या आवाजावरुन बादशहाच्या गाण्याला म्युझिक; चाहत्याने एडिट केलेला व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

देवोलिना भट्टाचार्जी नुकतीच बॉयफ्रेंड शाहनवाजसह विवाहबंधनात अडकली आहे. आंतरधर्मीय विवाह केल्याने लग्नाच्या दिवसापासूनच तिला ट्रोल केलं जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant reveals devoleena bhattacharjee washed abhijeet bichukale clothes in bigg boss house kak