अभिनेत्री राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. पण आता पती आदिल खान दुर्रानीच्या गंभीर आरोपांच्या जाळ्यात राखी अडकली आहे. ६ महिन्यांनंतर जेल बाहेर येताच आदिलने काल (सोमवारी) पत्रकार परिषद घेऊन राखीची पोलखोल केली. पण आज राखीने सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आदिलला सडेतोड उत्तर देत त्याच्यावर गंभीर आरोप केले. शिवाय आदिल तिला का टार्गेट करतोय? यामागच्या कारणांचा तिने खुलासा केला.

हेही वाचा – तेजश्री प्रधानबरोबर ‘प्रेमाची गोष्ट’ सेटवर कसं आहे नातं? शुभांगी गोखले म्हणाल्या, “तो बालिशपणा…”

Kartik Aaryan Recalls His Struggle
वारंवार नकार तरी मानली नाही हार; कार्तिक आर्यनने शेअर केल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाला, “मला लाज…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”

सुरुवातीला ड्रग्ज देण्याच्या आदिलच्या आरोपावर राखी आणि तिच्या वकिलाने उत्तर दिले. राखी म्हणाली की, “जर यात सत्यता असेल, तर त्याने न्यायालयात हा मुद्दा का मांडला नाही? त्याने तेव्हाच याविषयी याचिका दाखल करायला पाहिजे होती ना? परंतु, आता ६ महिन्यांनंतर त्याला हे आठवतं आहे. बिग बॉस क्वीनवर लावलेले हे सर्व आरोप फेक आहेत.”

हेही वाचा – लग्न कधी करतोयस? या प्रश्नावर शिव ठाकरे म्हणाला, “खरंतर…”

त्यानंतर राखीची वकील म्हणाली की, “म्हैसूरमध्ये ६ हून अधिक गुन्हे आदिल खान विरोध दाखल आहेत. रेप व्यतिरिक्त फसवणुकीसंदर्भातही गुन्हे दाखल आहेत. आता आदिलने पुन्हा एकदा जेलमध्ये जाण्यासाठी मार्ग खुला करून दिला आहे. त्याने काही गोष्टी बोलून न्यायालयाचा अवमान केला आहे.”

हेही वाचा – बिग बॉस फेम अभिनेत्याने केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक, फोटो शेअर करत म्हणाला…

त्यानंतर पुढे राखी म्हणाली की, “त्याने फक्त मलाच का टार्गेट केले? कारण त्याला पब्लिसिटी पाहिजे. त्याला बिग बॉसमध्ये जायचे आहे. तसेच त्याला एकता कपूरच्या शोमध्ये जायचे आहे. त्याला स्टार बनायचे आहे.”

दरम्यान, २०२२मध्ये आदिल आणि राखीने कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर जूनमध्ये त्यांनी निकाह सुद्धा केला. याचा खुलासा राखीने ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच केला होता. तेव्हा आदिलने राखीबरोबरचे लग्न मान्य करण्यास नकार दिला होता. पण त्यानंतर थोड्या दिवसांनी आदिलने राखीबरोबरचे लग्न मान्य केले होते.

Story img Loader