बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल विविध खुलासे करताना दिसत आहे. राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीविरोधात तक्रार केली होती. आदिलने मला मारहाण केली, असा आरोप राखीने केला होता. यामुळे मुंबई पोलिसांनी राखीचा पती आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणानंतर राखी ही आदिलबद्दल विविध गौप्यस्फोट करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राखी सावंत आणि शर्लिन चोप्रामध्ये वाद मिटल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखी सावंतने नुकतंच अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राची भेट घेतली. यावेळी त्या दोघांनी आदिल खानबद्दल चर्चा केली. यानंतर राखीने प्रसारमाध्यमांसमोर येत शर्लिन चोप्राचे आभार मानले. “मला शर्लिनने प्रेरणा दिली”, असे राखीने यावेळी म्हटले.
आणखी वाचा : न्यूड फोटोशूट ते बोल्ड भूमिका, राखी सावंतच्या अटकेमुळे चर्चेत आलेली शर्लिन चोप्रा कोण?

“मी शर्लिन चोप्राचे आभार मानते. कारण काल मी आणि ती भेटलो. तिने मला प्रेरणा दिली आहे. तिलाही माझ्याबद्दल ऐकून फार वाईट वाटलं. अशा परिस्थितीतही शर्लिनने मला हिंमत दिली. याचा मला आनंद आहे. तिने मला मदत केली आणि भावनिकदृष्ट्या पाठिंबाही दिला”, असे राखीने यावेळी म्हटले.

“मी अनेकदा बोलायची की माझं आदिलवर खूप प्रेम आहे, पण आता मी सांगतेय की माझं माझ्या स्वत:वर खूप प्रेम आहे. मला जगायचं, मला चांगलं काम करायचं. मला चांगली व्यक्ती व्हायचं”, असेही तिने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “तो माझा भाऊ…” राखी सावंतविरोधात तक्रार देणाऱ्या अभिनेत्रीचा आदिलला पाठिंबा; म्हणाली “चर्चेत राहण्यासाठी…”

दरम्यान गेल्या महिन्यात राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली होती. राखीविरोधात मॉडेल शर्लिन चोप्रानं तक्रार दाखल केली होती. राखीने शर्लिनचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant say thanks sherlyn chopra amid ongoing spat with husband adil khan nrp