अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दोन वर्षांपूर्वी तिने आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या संसारात बरेच वाद निर्माण झाले आणि आदिलवर अनेक आरोप लावत राखीने त्याला तुरुंगात पाठवलं. नुकतीच आदिलची तुरुंगातून सुटका झाली असून आता तो बाहेर आल्यावर त्याने राखीवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्या सर्व आरोपांवर आता राखीने उत्तर दिलं आहे.

आदिल खान तुरुंगातून नुकताच बाहेर आला. यानंतर त्याने एक पत्रकार परिषद घेऊन त्याची बाजू सर्वांसमोर मांडली. राखीने त्याला ड्रग्स दिले, त्याचे न्यू व्हिडीओ काढले असं आदिल म्हणाला होता. त्याबरोबरच राखी खूप खोटी आहे खालच्या पातळीची आहे असं म्हणत तिच्यावर अनेक आरोप केले. या सगळ्याला उत्तर देण्यासाठी आता नुकतीच राखीने एक पत्रकार परिषद घेतली. त्यात आदिलने तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ विकल्याचं ती म्हणाली.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
Malegaon bank accounts, misappropriation of crores,
मालेगाव बँक खात्यांद्वारे कोट्यावधींचे गैरव्यवहार प्रकरण : ईडीचे मुंबई व अहमदाबादमध्ये छापे, १३ कोटी ५० लाखांची रोख रक्कम जप्त

आणखी वाचा : Video: “आईच्या निधनानंतर राखी बिर्याणी खात होती”, आदिल खानने दाखवला व्हिडीओ; म्हणाला, “आईचं पार्थिव…”

राखी म्हणाली, “आदिल खान दुर्रानी या माझ्या नवऱ्याने माझे न्यूड व्हिडीओ ५०-५०लाख, ४७ लाखाला विकले. मी हनिमूनला बाथटबमध्ये बसले आहे, आंघोळ करते आहे, आदिल बरोबर बेडवर आहे असे सगळे व्हिडिओ त्याने शूट केले आणि एका अरब माणसाला विकले.” तर त्यावर तिच्या बाजूला बसलेला वाहिद खान म्हणतो, “आम्ही तुम्हाला सगळंच सांगू शकत नाही. काही गोष्टी आम्हाला कोर्टासमोर मांडायच्या आहेत.”

हेही वाचा : “तो मला रोज मारतो”, राखीने खुलासा करताच आदिल म्हणाला, “ती…”

तर आता राखीच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावरून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वी देखील राखीने एकदा आदिलने तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ विकल्याचं म्हटलं होतं. तर आता पुन्हा एकदा तिने त्याच्यावर हा गंभीर आरोप केला आहे.

Story img Loader