बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून दिसत नाहीये. सतत आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या राखीला पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. पण काही महिन्यांपूर्वी तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यामुळे सध्या ती उपचार घेत आहे. मे महिन्यात तिच्या गर्भाशयातून १० सेमीचा ट्यूमर काढण्यात आला होता. त्यानंतर राखीला नीट चालता देखील येत नव्हतं. तिचा पहिला पती रितेश कुमारने तिचा रुग्णालयातला व्हिडीओ शेअर केला होता. पण शस्त्रक्रियेनंतर राखी कुठेही दिसली नाही. त्यामुळे राखी सावंत कुठे आहे? सध्या काय करते? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या सर्व प्रश्नांची उत्तरं राखीचा भाऊ राकेश सावंतने दिली आहेत. तसंच राखीच्या प्रकृतीविषयी देखील त्यानं सांगितलं.

‘इंस्टंट बॉलीवूड’ या एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधताना राकेश सावंतने राखीविषयी माहिती दिली. तो म्हणाला, “मी सगळ्यांचे आभार मानतो. कारण राखीची प्रकृती स्थिर आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहे. मी फक्त सांगेन सर्वांनी प्रार्थना करा.”

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
High Court rejects plea for abortion in 31st week
एकतिसाव्या आठवड्यात गर्भापाताची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Astrology Predictions Number 1 in Marathi
Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन
operation tumor Iraq girl, oral tumor Iraq girl,
मुंबई : दहा वर्षांच्या इराकी मुलीवर तोंडाच्या ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया!
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
Shani Sade Sati 2025
३० वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार शनिची साडेसाती, जाणून घ्या, कसे जाणार २०२५ वर्ष?

हेही वाचा – Video: ‘मुरांबा’ मालिकेत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्याची स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’मध्ये जबरदस्त एन्ट्री! पाहा प्रोमो

पुढे राकेश म्हणाला, “मी दररोज तिला भेटत आहे. जी काही अफवा लोकांनी पसरवली आहे, ते तिचे शत्रू आहेत. त्यांना नेहमी वाटतं असतं की, राखीला कशाही प्रकारे त्रास द्यावा. पण ती जिथे आहे, तिथे ती सुखरुप आहे. ती सर्व उपचार घेत आहे. तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिला तीन-चार महिने आराम करायला सांगितलं आहे. १० सेमीचा ट्यूमर काढला असून तो तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर अजून एक शस्त्रक्रिया होणार आहे. कारण डॉक्टरांना आणखी एका ट्यूमरचं निदान झालं आहे. त्यामुळे तिला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. तिला पथ्य पाळावी लागणार आहेत. त्यानंतर तिची रक्त तपासणी होणार आहे. मग ती पुन्हा मनोरंजनासाठी येईल. त्यामुळे तिच्यासाठी प्रार्थना करा.”

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या लग्नाआधी RSS प्रमुख मोहन भागवतांनी अँटिलियामध्ये घेतली अंबानी कुटुंबाची भेट, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, राखी सावंतवर रुग्णालयात उपचार सुरू असताना जीवघेणा हल्ला झाला होता. याची माहिती तिचा पहिला पती रितेश कुमारने दिली होती.

Story img Loader