राखी सावंतचा पती आदिल खान तुरुंगात बाहेर आला आहे. त्याने तुरुंगातून बाहेर येताच राखी सावंतची पोलखोल करण्याचा इशारा दिला होता. त्याने सोमवारी माध्यमांशी संवाद साधला आणि राखीबद्दल अनेक खुलासे केले. राखीने पहिला पतीपासून घटस्फोट न घेताच आपल्याशी लग्न केल्याचा दावा आदिलने केला. इतकंच नव्हे तर राखीने तिच्या गर्भपाताबद्दल केलेलं विधान खोटं होतं, असंही आदिल म्हणाला आहे.

Video: इराणी तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आदिल खानने सोडलं मौन; म्हणाला, “३१ लाख रुपये…”

poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Pune Crime News
Pune Crime : “कात्री खुपसून पत्नीची हत्या करत पतीने व्हिडीओ शूट केला, आणि…”; पोलिसांनी सांगितला खराडीतील घटनेचा तपशील
kareena kapoor angry on paparazzi post
“हे सगळं थांबवा”, पती रुग्णालयात अन् मुलांबद्दलची ‘ती’ पोस्ट पाहून करीना कपूर खान संतापली; म्हणाली, “आम्हाला एकटं सोडा…”

आदिलशी लग्न केल्याचा खुलासा राखीने या वर्षाच्या सुरुवातीला केला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळी मीडियाशी बोलताना राखीने तिचा गर्भपात झाल्याचे सांगितले होते. यावर आदिल खुलासा करत म्हणाला, “ती गर्भवती कशी असू शकते. तिला काही समस्या होत्या. त्यानंतर तिचे ऑपरेशन करून गर्भाशय काढण्यात आले. मी स्वतः तिला रुग्णालयात भर्ती केले होते. मी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये असताना मला पोलिसांनी अटक केली होती.” आदिलच्या या दाव्यावर राखीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

“ड्रग्ज दिले, न्यूड व्हिडीओ काढला”, आदिल खानच्या आरोपांवर राखी सावंतची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “या माणसाचा…”

राखी सावंतने तिच्या गायनॅकॉलॉजिस्टच्या क्लिनिकमधून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला राखी सावंत भावूकपणे म्हणते की, देव सर्वत्र पोहोचू शकत नाही, म्हणून देवाने डॉक्टर बनवले आहेत जेणेकरुन आपल्यासारख्या लोकांना चांगले आयुष्य जगता येईल. “काही काळापूर्वी माझे गर्भाशयाचे ऑपरेशन झाले होते, आदिलशी लग्न केल्यानंतर मला बाळ हवे होते, पण जर मी वेळेआधी बाळाला जन्म दिला असता तर माझ्या गर्भाशयात फायब्रॉइड झाले नसते. मी आज माझ्या डॉक्टरांकडे आले आहे. ज्यांनी माझे फायब्रॉइड्सचे ऑपरेशन केले होते,” असं राखी व्हिडीओत म्हणते.

“राखीच्या गर्भाशयातील सर्व फायब्रॉइड्स काढून टाकण्यात आले असून ती आता पूर्णपणे बरी असल्याने राखी आई होऊ शकते,” असे डॉक्टर वीणा सांगतात. राखीचे गर्भाशय काढले नसल्याचंही डॉ. वीणा यांनी सांगितलं. यानंतर राखी म्हणाली की आदिल संपूर्ण जगाला सांगत आहे की मी आई होऊ शकत नाही, पण ते खोटं आहे. तो माझी बदनामी करतोय.

Story img Loader