हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबरचे फोटो, व्हिडीओ शेअर करत ती सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वळवत असते. त्याचप्रमाणे ती वरचेवर करत असलेली विधानेही चर्चेचा विषय ठरत असतात. नुकतेच तिने तिचे एक स्वप्न शेअर केले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर ती काय सुधारणा घडवून आणेल याबाबत तिने तिचे प्लॅन्स सांगितले आहेत.

आणखी वाचा : “बॉलिवूडमध्ये एक काळ असा येईल की…”, शाहरुख खानने ११ वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी ठरतेय खरी

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण

राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंतने ती मुख्यमंत्री झाली तर काय करायला आवडेल यावर भाष्य केले आहे. ती म्हणाली, “जर मला मुख्यमंत्री बनवलं तर मी ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या गोऱ्या गालांसारखे आणि गोऱ्या कंबरेसारखे रस्ते तयार करेन. आमच्या ड्रीम गर्लसारखे मी रस्ते सुंदर बनवीन. आपल्या देशात भरपूर खड्डे आहेत. तुम्ही हे विनोदामध्ये घेऊ नका.”

“चहा बनवून मोदीजी पंतप्रधान झाले तर बसून, आडवी पडून, हसत- हसत मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही?” असा प्रश्नही तिने शेवटी उपस्थित केला. तिच्या या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत तिची खिल्ली उडवत आहेत.

हेही वाचा : “तो मला रोज मारतो”, राखीने खुलासा करताच आदिल म्हणाला, “ती…”

हेमा मालिनी मधुरेच्या खासदार आहेत. मध्यंतरी एका मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी राखी सावंतचा उल्लेख केला होता. “कंगना राणौतला मथुरेतून भाजपची उमेदवारी मिळणार का?”, असा सवाल त्यांना काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, “तुम्हाला मथुरेत फिल्म स्टारच हवा आहे? उद्या राखी सावंतचेही यात नाव येईल.”

Story img Loader