अभिनेत्री राखी सावंतला गुरुवारी(१९ जानेवारी) रोजी आंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली. दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री राखीची पोलिसांकडून सुटका करण्यात आली.

पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. पाणावलेल्या डोळ्यांचा फोटो राखीने पोस्ट केला आहे. “जगातील सगळ्यात महागडं द्रव्य म्हणजे अश्रू. अश्रूंमध्ये १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात. कोणालाही दुखवण्याच्या आधी दोनदा विचार करा”, असं राखीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राखीची ही पोस्ट चर्चेत आहे.

Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
fugitive gangster arrested , Lonavala , MPDA ,
‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Suresh Dhas , Walmik Karad, Amol Mitkari allegation ,
अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ

हेही वाचा>> राखी सावंतचा पती आदिल खान आहे कोट्यधीश; जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

हेही वाचा>> शाहिद कपूरच्या घरी भाड्याने राहणार कार्तिक आर्यन, एका महिन्याचं भाडं आहे तब्बल…

दरम्यान, राखीने पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली होती. “जय महाराष्ट्र, जय भारत, मी फक्त माझ्या आईला भेटायला रुग्णालयात आले आहे. मला डॉक्टरांचा फोन आला की माझ्या आईची प्रकृती गंभीर झाली आहे. मला चक्कर येत आहे.  माझं बीपी लो झालाय. मी दिवसभर जेवणही केलेलं नाही,” असं राखी म्हणाली होती.

हेही पाहा>>Photos: अभिनेत्रीचा ‘तो’ एक व्हिडीओ आणि राखी सावंतला अटक, नेमकं प्रकरण काय?

राखीची आई गंभीर आजाराचा सामना करत आहे. तिच्या आईला कॅन्सर झाला असून त्यांना पक्षाघाताचा आजारही आहे. त्यांच्यावर सध्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader