राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. तिचा पती आदिल खानबरोबर वाद झाला आणि राखीने त्याच्याविरोधात तक्रार दिली. सध्या आदिल खान तुरुंगात आहे. राखीने तुरुंगात आदिलची भेटही घेतली आहे. आता राखीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने नमाज पठाण करताना रेकॉर्ड केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: आधी तक्रार दिली अन् आता तुरुंगात राखी सावंतने घेतली पतीची भेट; म्हणाली, “आदिल माझ्याशी खूप…”

राखी सावंतने इन्स्टाग्रामला रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती हिजाब घालून दिसत आहे. “नशिबाला जसं हवं होतं, तसे मी बदलले. खूप जपून पावलं टाकली, निर्णय घेतले, तरी चुकलेच मी. कोणी विश्वास तोडला तर कोणी हृदय. पण लोकांना वाटतं खूप बदलले आहे मी” अशा आशयाच्या ओळींवर राखीने हा व्हिडीओ तयार करून शेअर केला आहे.

राखी सावंतने पती आदिल खानवर फसवणूक केल्याचे आणि मारहाणीचे आरोप केले होते. आदिलने आपले पैसे घेतले आणि परत केले नाहीत, तसेच बिझनेस सुरू करण्यासाठी त्याने आईचे दागिने विकल्याचंही राखीने म्हटलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant shares video of namaz wearing hijab amid issues with husband hrc