रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17’ शेवटच्या टप्प्यात आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या शोमध्ये दररोज नवनवीन वाद व भांडणं पाहायला मिळत आहे. या शोमध्ये नुकताच फॅमिली वीक पार पडला. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या आई या शोमध्ये आल्या होत्या. विकीच्या आईने शोमध्ये येऊन अंकितावर नाराजी व्यक्त केली होती. अंकिताने विकीला लाथ मारली तेव्हा विकीच्या वडिलांनी थेट अंकिताच्या आईला फोन केला होता, असा खुलासाही त्यांनी केला होता. याचं अंकिताला खूप वाईट वाटलं.

यानंतर रश्मी देसाईपासून ऐश्वर्या शर्मापर्यंत आणि इतर कलाकारांनी अंकिताला पाठिंबा दिला आणि तिच्या सासूला सुनावलं होतं. आता राखी सावंतनेही एक व्हिडीओ शेअर करून अंकिताच्या सासूला फटकारलं आहे. एवढंच नाही तर राखीने अंकिताच्या सासूची तुलना रामायणातील कैकेयीशी केली आहे. याशिवाय सून व मुलाच्या संसारात ढवळाढवळ का करत आहात, असा प्रश्नही राखीने विचारला आहे.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ

Video: विकी जैनच्या वडिलांनी अंकिता लोखंडेच्या आईची काढली लायकी, अभिनेत्रीचा खुलासा; पतीला म्हणाली, “तुझ्या घरात मला…”

राखी सावंत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी अंकिताच्या सासूला हे सांगू इच्छिते की ‘सास भी कभी बहू थी’ (सासू कधी तरी सून होती) तुम्ही नवरा-बायकोच्या भांडणात का पडताय? एकदा तुमच्या मुलाने विक्कीने अंकिताशी लग्न केलं ना, मग तुम्ही त्यात का हस्तक्षेप करताय? सासूबाई शांततेत बसा ना. खा-प्या आणि ऐश करा सासूबाई.”

सासूबाईनंतर अंकिता लोखंडेच्या आईचाही तिने सुशांतचे नाव घेण्यावर आक्षेप, विकी जैनच्या कुटुंबाचा उल्लेख करत म्हणाल्या…

राखी पुढे म्हणाली, “अंकिताच ट्रॉफी जिंकणार आहे. अंकिता बिग बॉस जिंकणार आहे, ही माझी भविष्यवाणी आहे. आमची मराठी मुलगी अंकिताच शो जिंकणार आहे. मग तुम्ही आनंद व्यक्त कराल की माझी सून जिंकली, माझी सून जिंकली. असं करू नका अंकिताच्या सासूबाई. शांत बसा. तुमचा मुलगा आणि सून यांच्यात बोलू नका. सुनेचा आदर करा. मग तुमच्या मुलीचाही आदर केला जाईल.”

अंकिता लोखंडे शोमध्ये वारंवार करते एक्स बॉयफ्रेंड सुशांतचा उल्लेख; तिच्या सासूबाई म्हणाल्या, “ती त्याचं नाव घेऊन…”

राखी पुढे म्हणाली, “अंकिता माझी बहीण आहे. मी तुम्हाला तुमच्या घरी भेटले होते, तुम्हाला आठवतंय का? मी आले होते. तुम्ही मला देवीसारख्या वाटल्या होत्या. पण अचानक तुम्ही अशा कशा झाल्यात? कैकेयी होऊ नका. संसार उद्ध्वस्त करू नका. विकी चांगला मुलगा आहे. चांगला नवरा आहे. त्याला प्रेमाने सांगा की त्याच्या पत्नीला साथ दे. हे बिग बॉसचे घर आहे. इथे वाद आणि भांडणं होतच असतात. यात काय मोठी गोष्ट आहे? अंकिता तुमची सून नाही मुलगी आहे, तिला प्रेमाने ठेवा.”

Story img Loader