हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. याचबरोबर राखी सावंतचा अतरंगीपणा नेहमीच सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असतो. तर आता चक्क ती तिच्या चाहत्यांचे फोन घेऊन पळाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
राखी सावंतच्या दिलखुलासपणामुळे तिचा चाहतावर्ग गेल्या काही वर्षात प्रचंड वाढला. तिला अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर पाहण्यात येतं. अनेकदा ती तिथे तिच्याशी बोलायला आलेल्या, तिच्याबरोबर फोटो काढायला आलेल्या चाहत्यांशी गप्पाही मारते. आता असाच तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
नुकतीच राखी सावंत एका कार्यक्रमात पोहोचली होती. तिथे तिचे दोन चाहते तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी आले. मात्र राखीने त्यांना सेल्फी देत असताना त्यांच्या हातातून अचानक त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि ती तिच्या गाडीत जाऊन बसली. गाडीत बसल्यावर राखी म्हणाली, “मी देणार नाही. तुम्ही सेल्फी घेतला आहे ना? तुम्ही सेल्फी काढलात आणि पुन्हा घेणार नाही ना? आधी सॉरी म्हणा.” असं म्हणत राखीने एकाचा फोन परत केला आणि दुसऱ्या चाहत्याच्या मोबाईलमध्ये त्याच्याबरोबर सेल्फी काढून त्यालाही त्याचा फोन देऊन टाकला.
हेही वाचा : “नमाज पठण करताना ‘असे’ कपडे…” नव्या व्हिडीओमुळे राखी सावंतवर नेटकरी नाराज
आता तिचा हा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. आता या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी तिच्या या दिलखुलासपणाचं कौतुक केलं. तर याच बरोबर काहींनी तिला यावरून ट्रोलही केलं आहे.