बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. वेगवेगळे लूक करून राखी चाहत्यांसमोर येत असते. काही दिवसांपूर्वी ती लाल रंगाच्या टॉवेलने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पण त्यानंतर राखीला रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर आलं. तेव्हापासून तिला कॅन्सर झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण आता राखीने स्वतः प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा – Video: ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत जबरदस्त वळण, खोट्या अर्जुन मागचा मास्टमाईंड आहे ‘हा’ चेहरा

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, राखी सावंत म्हणाली, “मी लवकरच बरी होईन. मी सध्या आरोग्याच्या समस्येतून जात आहे. माझ्या गर्भाशयात १० सेमीचा ट्यूमर आहे आणि शनिवारी त्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. मी माझ्या आरोग्याबाबत जास्त काही बोलू शकत नाही. पण रितेश तुम्हाला वेळोवेळी माहित देत राहिलं. माझ्या आरोग्याच्या स्थितीबाबत तो तुम्हाला अपडेट देईल. मी ट्यूमर दाखवेन, फक्त शस्त्रक्रिया होऊ दे. मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. कारण शस्त्रक्रियेपूर्वी माझा बीपी आणि इतर चाचण्या होणार होत्या. मला आता सर्वकाही माहित नाही. मी काही डॉक्टर नाही. मी अभिनेत्री आहे.”

हेही वाचा – ‘झी मराठी’च्या नवीन मालिका जुन्यांवर वरचढ; ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटरलरला’चा वाढला टीआरपी

पुढे राखी म्हणाली, “इथले डॉक्टर खूप चांगले आहेत. आपलं काम प्रमाणिकपणे करत आहेत. मी आयुष्यात कधीच हार मानली नाही. बालपणापासून अनेक संकटांना झुंज दिली आहे. आता मी ऑपरेशन थिएटरमध्ये लढण्यासाठी जात आहे”, असं म्हटल्यानंतर राखी रडू लागली.

हेही वाचा – Video: ‘हीरामंडी’तील लोकप्रिय गाण्यावर मनमोहक अदाकारी करणारी ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री कोण? ओळखा पाहू

“मला माहितीये मला काहीच होणार नाही. कारण माझ्याबरोबर माझ्या आईचा आशीर्वाद आहे. ती माझ्याबरोबरच आहे. मी एक फायटर आहे आणि मी परत येईन. थोडासा ट्यूमर निघू देत. मी परत येऊन नाचेल आणि गाईन. मला ट्यूमर आहे हे माहित नव्हतं. मी टॉवेलमध्ये डान्स करत होते. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा बेशुद्ध झाले. तातडीने मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व चाचण्यांच्या अहवालानंतर समजलं की, मला ट्यूमर आहे. पण मला माहितीये मी पुन्हा एकदा सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी येईन,” असं राखी म्हणाली.

Story img Loader