अभिनेत्री राखी सावंतने काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नाबाबत खुलासा केला. बॉयफ्रेंड आदिल खानशी कोर्ट मॅरेज व निकाह करुन विवाहबंधनात अडकल्याचं राखी म्हणाली. सात महिन्यांपूर्वीच लग्न केल्याचं आदिलने मान्य केल्यानंतर आता त्यांच्या हनिमूनच्या चर्चा रंगल्या आहेत.
लग्नानंतर आदिल खानबरोबर हनिमूनला जाण्याच्या चर्चांवर राखीने भाष्य केलं आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’शी बोलताना राखीने आदिल व ती लग्नानंतर कुठे जाणार आहे, याचा खुलासा केला आहे. राखी आदिलबरोबर हनिमूनला जाणार नसून ती उमराह या मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक यात्रेला जाणार असल्याचं म्हटलं आहे. राखी म्हणाली, “हनिमून आधी आदिल मला उमराहसाठी घेऊन जाणार आहे. हनिमूनपेक्षा आमच्यासाठी उमराह महत्त्वाचं आहे. जे नातं अल्लाह जोडतो, ते कुणीच तोडू शकत नाही. माझं आणि आदिलचं नात पक्कं होऊन, मला संसार करायचा आहे. एवढीच माझी इच्छा आहे”.
हेही वाचा>>‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावर शाहरुख खानने सोडलं मौन, म्हणाला “दीपिका…”
हेही वाचा>> अमृता फडणवीसांनी सरकारी बंगल्यात बनवला रील? राष्ट्रवादीचा आरोप; म्हणाल्या “रियाझ अलीबरोबर…”
उमराह म्हणजे काय?
मक्कामधील हरम शरीफ यांच्या यात्रेला उमराह म्हटलं जातं. अरबी भाषेत उमराहचा अर्थ ‘लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचं दर्शन’. ही एक धार्मिक यात्रा आहे. मुस्लीम समाजात आपल्या गुन्ह्यांची/चुकांची माफी मागण्याची संधी उमराहमध्ये मिळते. मुस्लीम समाजात असं मानलं जातं की, उमराह केल्यानंतर संबंधित व्यक्ती त्याच्या पापातून मुक्त होते, असा समज आहे.
हेही पाहा>> रितेश देशमुख-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या
दरम्यान, राखी सध्या अडचणीचा सामना करत आहे. तिची आई कॅन्सरग्रस्त असून त्यांच्यावर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईच्या उपचाराचा खर्चही जास्त असल्याने राखीने मदतीसाठी आवाहन केलं होतं. त्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी राखीच्या मदतीला धावून आल्याचं अभिनेत्रीने सांगितलं होतं.