अभिनेत्री राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. ती बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर तिचा पती आदिल खानचं तनू नावाच्या मुलीशी सूत जुळलं, त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला आहे. आदिलच्या अफेअरबदद्ल कळाल्यानंतर राखीने तिच्या लग्नाची कबुली दिली होती, तसेच आदिलबरोबरचे लग्नाचे फोटोही शेअर केले होते. आधी लग्नास नकार देणाऱ्या आदिलने नंतर लग्न स्वीकारलं होतं. पण, आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद झाला आहे आणि त्यांचं लग्न घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं आहे.
राखी सावंतच्या तक्रारीनंतर आदिल खानला अटक; अभिनेत्री रडत म्हणाली, “तो मला…”
राखी सावंतच्या पतीला आज ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राखीच्या तक्रारीमुळे आदिलला पोलिसांनी चौकशीसाठी आणल्याची माहिती समोर आली आहे. राखी सावंतनेच पती आदिल खान दुर्रांनीविरोधात ओशिवरा पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आदिलने मारहाण केली व दागिने नेल्याचा आरोपही राखीने केला होता.
राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अटक
राखीने तिच्या आईच्या मृत्यूलाही आदिलला जबाबदार धरलं आहे. आदिलचं तनू नावाच्या मुलीशी अफेअर असून तो तिच्याबरोबर राहत आहे. राखीने आदिलला समजावलं आणि तिला सोडून आपल्यासोबत राहण्यास सांगितलं, पण आदिल गर्लफ्रेंडबरोबर राहत आहे. त्यामुळे राखीने आता घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलंय.
Video: आदिल खान गुन्हेगार? राखी सावंतनेच केला पतीबद्दल गौप्यस्फोट; म्हणाली, “म्हैसूर पोलीस…”
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, राखी म्हणाली, “आता मला आदिलसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही. मी अशा माणसासोबत राहू शकत नाही जो इतक्या मुलींसोबत नात्यात राहतो आणि त्यांच्याबरोबर झोपतो. त्याने माफी मागून तनूला सोडावे अशी माझी इच्छा होती. पण, आदिलने ऐकलं नाही. त्याने माझी फसवणूक केली आहे. तो एकनिष्ठ नाही. म्हणून मी आता घटस्फोट घ्यायचं ठरवलं आहे.”
राखीने सध्या तरी आदिलविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे, पण घटस्फोटाचा अर्ज केलेला नाही. त्यामुळे राखी खरंच घटस्फोट घेणार की आदिलबरोबर तडजोड करेल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.