Ram Kapoor Weight Loss Journey : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राम कपूरने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली होती. त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याने तब्बल ५५ किलो वजन कमी केले असल्याची माहिती दिली होती. आता त्याने त्याच्या या वजन घटवण्याच्या प्रवासावर (वेट लॉस जर्नीवर) भाष्य केले असून त्याचे वजन १४० किलो होते, हेही उघड केले आहे.

वजन कमी करण्याचा प्रवास

‘ईटाइम्सला’ दिलेल्या मुलाखतीत राम कपूरने त्याच्या वेट लॉस जर्नीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, त्याचे वजन जास्त असतानाही प्रेक्षकांनी त्याला खूप प्रेम दिले. तो म्हणाला, ” ‘नीयत’ चित्रपट आणि ‘जुबली’ सीरिजच्या शूटिंगदरम्यान माझे वजन १४० किलो होते. या भूमिका माझ्या शरीरच्या आकाराला अनुकूल होत्या, पण मला माहिती होते की मी अस्वस्थ आहे. फक्त २० पावले चालल्यानंतर माझा श्वास फुलायचा आणि मला डायबेटिससारखे आजार होते. माझ्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे हलणंही खूप कठीण झालं होतं.” असे तो म्हणाला.

madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
zee marathi lakshmi niwas serial 3 idiots fame actor
3 Idiots फेम अभिनेता ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत साकारतोय ‘ही’ भूमिका, तुम्ही ओळखलंत का?
shashank ketkar will become father for second time
शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिली गुडन्यूज, पत्नी व मुलासह केलं खास फोटोशूट
Water supply Kalyan Dombivli titwala
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
tharla tar mag fame sayali kusum and madhubhau dances on bollywood song
फिर भी ना मिला सजना…; ‘ठरलं तर मग’ फेम सायली, कुसुम अन् मधुभाऊंचा जबरदस्त डान्स! ‘ते’ गाणं ऐकून नेटकरी म्हणाले…
Alka Kubal
“त्या रोज पॅक अप झालं की…”, अलका कुबल यांनी सांगितली स्मिता पाटील यांची आठवण; म्हणाल्या…
Lakshami Niwas
Video : लग्नादिवशीच श्रीकांतचा अपघात होणार, भावनाच्या आयुष्यात नवीन वादळ येणार; प्रोमोवर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले…

हेही वाचा…Video : आशा भोसले यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी ‘तौबा तौबा’ गाणे गात धरला ठेका, केली विकी कौशलची प्रसिद्ध हूकस्टेप

राम कपूरने केले अफवांचे खंडन

राम कपूरने सर्जरी करून किंवा औषधे घेऊन वजन कमी केले आहे, असे काही लोकांचे म्हणणे होते. मात्र, राम कपूरने या अफवांचे खंडन केले. त्याने स्पष्ट केले की, सर्जरी किंवा कोणत्याही बाह्य उपायांशिवाय त्याने स्वतःची मानसिकता, जीवनशैली आणि सवयी बदलून पारंपरिक पद्धतीने वजन कमी केले आहे. दृढ संकल्पामुळे त्याने त्याचे वजन ८५ किलोपर्यंत कमी केले.

कायमस्वरूपी बदलाचा निर्णय

‘कसम से’ या मालिकेतील अभिनेता राम कपूरने मान्य केले की, त्याने याआधी दोनदा ३० किलो वजन कमी केले होते, पण त्याचे वजन पुन्हा वजन वाढले. मात्र, यावेळी त्याने हा बदल कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आपले खाणे-पिणे, झोप, व्यायाम, हायड्रेशन आणि उपवास यावर लक्ष केंद्रित केले. “माझ्या जुन्या अवस्थेबद्दल मी खूप असमाधानी होतो. भावनिकदृष्ट्या खूप खालावल्यावर मी पुन्हा स्वतःला तयार करण्याचा निर्णय घेतला,” असे त्याने सांगितले.

हेही वाचा…Video : “हजारों जवाबों में खामोशी अच्छी…”, दिलजीत दोसांझने लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान केले डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मरण; म्हणाला…

आता तरुण असल्यासारखे वाटते

राम कपूरने पुढे सांगितले की, “आता मला स्वतःचे वय २५ वर्षे असल्यासारखे वाटते आणि आता मी १२ तास न थांबता सतत चालू शकतो.”

हेही वाचा…Video: ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीने भावाच्या लग्नात आजीबरोबर ‘झिंगाट’ गाण्यावर केलेला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

वेब सीरिजमध्ये झळकणार राम कपूर?

आपल्या भविष्यातील योजनांबद्दल सांगताना राम कपूरने म्हटले की, “माझ्या ट्रान्सफॉर्मेशनसहच माझ्या भूमिका देखील बदलत आहेत. पुढील वर्षी मी एका वेब सीरिजमध्ये एक तरुण पात्र साकारणार आहे.”

Story img Loader