प्रेक्षकांना आवडणाऱ्या मालिकेत ट्विस्ट येणार असेल, नवीन वळण येणार असेल तर चाहते त्या भागाची आतुरतेने वाट पाहत असतात, त्याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता असते. आता स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणाऱ्या ‘मुरांबा'(Muramba) या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, रेवा आणि अक्षयच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. गुरुजी सांगतात, चला वधूला मंगळसूत्र घाला. अक्षय मंगळसूत्र हातात घेतो, रेवाच्या गळ्यात घालणार तितक्यात तो उठून उभा राहतो आणि डोक्याचा फेटा काढतो. तो म्हणतो, “हा लग्नाचा घाट तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी नाही तर पोलिसांच्या बेड्या हातात ठोकण्यासाठी घातला आहे.” तिथे पोलिस येतात. अक्षय रमाजवळ जातो आणि रेवाकडे पाहून म्हणतो, “मी काहीच विसरलो नव्हतो, रमाच माझी बायको आहे आणि आयुष्यभर राहील.” हे ऐकल्यानंतर रेवा मंडपातून पळायला सुरुवात करते, मात्र तोल जाऊन खाली पडते. रमा हातात जळलेले लाकूड घेऊन तिच्याकडे येते आणि तिला म्हणते, “आरती वहिनींचा खून आणि माझ्या सौभाग्याला संपवण्याचा प्रयत्न, स्वत:चा गुन्हा कबूल कर.”

tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Tharla Tar Mag Serial New Track
‘ठरलं तर मग’ मालिकेत नवीन वळण! सायलीचा लूकही बदलला; मधुभाऊंनी लेकीसाठी घेतला कठोर निर्णय…; पाहा प्रोमो
Navri Mile Hitlarla
Video: आजी बेशुद्ध पडणार; एजे लीलावर चिडणार? प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “एकदाच तिला घराबाहेर…”
Shocking video
“आ बैल मुझे मार..” बैलाच्या नादाला लागणं काकाला पडलं महागात, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाहने, “रेवा सगळ्यांसमोर कबूल करेल का सत्य…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. “लय भारी केलं अक्षय-रमा, छान बरं वाटलं. अक्षय-रमा आवडलं”, “मला नाही वाटत रेवा गुन्हा कबूल करेल”, “देव करो आणि आता काही ट्विस्ट नको. शशिकांत मुकादम आणि आई आजीला रमाला जीव लावण्याची सुबुद्धी देओ”, “असंच झालं पाहिजे”, “मस्त रमा अक्षय. आता तरी रेवाला अद्दल घडेल”, “आणखी काही तरी ट्विस्ट आणाल. बास करा टीम मुरांबा”, “लय भारी”, “हा एपिसोड बघण्यासाठी वाट बघू शकत नाहीये”, अशा नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षक हा एपिसोड बघण्यासाठी उत्सुक असून ‘मुरांबा’च्या या प्रोमोवर खूश असल्याचे दिसत आहेत.

हेही वाचा: “तुझा काय XX…”, प्रसिद्ध गायिकेविषयी अनु मलिकने केलेली आक्षेपार्ह टिप्पणी; नेमकं काय घडलेलं?

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, रेवाला अक्षयबरोबर लग्न करायचे असते, ती त्यासाठी सातत्याने प्रयत्न करते. मात्र, तिच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. रेवा अक्षयला मारण्याचा प्रयत्न करते, यामध्ये अक्षयला डोक्याला मार लागतो. तो रेवाचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी काहीही आठवत नसल्याचे नाटक करतो. त्यानंतर तो रेवाबरोबर प्रेम असल्याचेदेखील नाटक करतो. आजी आणि शशिकांत मुकादम म्हणजेच अक्षयचे वडील त्यांचे लग्न ठरवतात. हे नाटक खूप दिवसांपासून सुरू आहे. आता मात्र अक्षयने रमाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयने रमाला प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान, आता रेवा तिचा गुन्हा कबूल करणार का, तिचे सत्य सर्वांसमोर येणार का आणि अक्षयने रमाला दिलेल्या वचनाप्रमाणे तो तिच्याशी पुन्हा एकदा लग्न करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader