छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अनेक कलाकार घराघरांत लोकप्रिय होतात. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘का रे दुरावा’, ‘रमा राघव’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या शीतल क्षीरसागरने आज प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकत्याच स्टार मीडिया मराठीला दिलेल्या मुलाखतीत शीतलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.
लग्न झालेलं नाही त्यामुळे लोक टोमणे मारतात असं अभिनेत्रीने या मुलाखतीत सांगितलं. शीतल म्हणाली, “लग्नाबद्दल प्रश्न विचारणं साहजिक आहेत. आयुष्य हे प्रत्येकासाठी सारखं नसतं. तुमच्या फूटपट्टीने इतरांचं आयुष्य तोलू मापू शकत नाही. हा माझा प्रवास आहे, मी एन्जॉय करते आहे. बरेचजण असे प्रश्न विचारतात. अनाहूत सल्ले देतात. इकडतिकडची स्थळं सुचवतात. मला राग येत नाही.”
हेही वाचा : गोळीबार प्रकरणानंतर सलमान सेटवर केव्हा परतणार? वडील सलीम खान म्हणाले, “सरकारने आम्हाला…”
शीतल पुढे म्हणाली, “रस्त्यात आजीबाई विचारतात, तेव्हा मी सांगते, माझं अजून लग्न झालेलं नाही. तेव्हा त्या आजीबाईंना प्रश्न पडतो. अरे तुझं का लग्न झालं नाही? इतकी छान दिसतेस, मग का नाही झालं. आपले ठोकताळे असतात. तसं घडत नसलं की धक्का बसतो. समोरच्यामध्ये काहीतरी कमी आहे असं नसतं. अमुक वयात शिक्षण पूर्ण करा, मग नोकरी करा. मग लग्न करा. मूलबाळ असा ठरलेला पॅटर्न आहे.”
हेही वाचा : सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर विवेक ओबेरॉयचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, केलेलं बिश्नोई समाजाचं कौतुक
“घर-फार्महाऊस-विदेशवारी. हे ठोकताळे आहेत. सगळ्यांचं आयुष्य तसं नसतं. तुम्ही त्यांच्या नजरेत अपयशी ठरता. माझ्यासारख्या अनेकजणी आहेत, अनेकजण आहेत. नाराज-निराश व्हायचं कारण नाही. मी माझी कंपनी एन्जॉय करते. हा लोनलीनेस नाही, हा सॉल्टिट्यूड आहे.” असं मत शीतलने मांडलं.